Operation Tiger  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena MPs: कोट्यवधींचा निधी पडून, तरी विकासनिधी न मिळाल्याचा दोष : 6 फुटीर खासदारांच्या दाव्यांची आकडेवारीतून पोलखोल

MPLADS Fund Utilization, Shiv Sena MPs, Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडलेल्या सहा खासदारांच्या MPLADS निधी वापराची आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश खासदारांनी मंजूर निधीचा अत्यल्प वापर केल्याचे दिसून येते.

सरकारनामा ब्यूरो

MPLADS Fund Utilization: काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण 'ऑपरेशन टायगर' ने ढवळून निघाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांनी सोमवारी (२२ जून) शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांनी पक्ष सोडताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भेटत नाहीत, पक्षांतर्गत काही नेत्यांबद्दलची नाराजी, विकासकामांसाठी सत्तेची गरज आणि निधी मिळत नसल्याची प्रमुख कारणे त्यांनी दिली होती.

'खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना' (MPLADS) ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण केंद्रीय योजना आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक खासदाराला त्याच्या मतदारसंघात रस्ते, शाळा, पिण्याचे पाणी आणि आरोग्य यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रतिवर्षी ५ कोटी रुपयांपर्यंतच्या कामांची शिफारस करण्याचा अधिकार असतो. त्यासाठी त्यांना या योजनेअंतर्गत निधी मिळतो.

या खासदारांनी आरोप केले तसं खरंच या खासदारांना निधी मिळत नव्हता का, आता पर्यंत या खासदारांना किती निधी मिळाला आहे, पाहूयात.

१. संजय उर्फ बंडू जाधव

एकूण मंजूर निधी- १४.७ कोटी

खर्च केलेला निधी- ३.७८ कोटी ( २५.७%)

आतापर्यंत केलेली कामे- ५६ पैकी २५ (३०%)

२. संजय देशमुख

एकूण मंजूर निधी- १८.६ कोटी

खर्च केलेला निधी- १.४२ कोटी (७.६%)

आतापर्यंत केलेली कामे- १०६ पैकी ७ (६.२%)

३. संजय दिना पाटील

एकूण मंजूर निधी- १४.४ कोटी

खर्च केलेला निधी- १५ लाख (१.१ %)

आतापर्यंत केलेली कामे- ४० पैकी ० ( ० %)

४. भाऊसाहेब वाकचौरे

एकूण मंजूर निधी- १४.७ कोटी

खर्च केलेला निधी- ७१ लाख (४.९ %)

आतापर्यंत केलेली कामे- १३५ पैकी २ ( १.५ %)

५. नागेश पाटील आष्टीकर

एकूण मंजूर निधी- १९ कोटी

खर्च केलेला निधी- ५.०६ कोटी (२६.६ %)

आतापर्यंत केलेली कामे- ७९ पैकी २८ (२६.२ %)

६. ओम राजेनिंबाळकर

एकूण मंजूर निधी- १८.५ कोटी

खर्च केलेला निधी- १.९७ कोटी (१०.७%)

आतापर्यंत केलेली कामे- १३० पैकी २१ (१३.९%)

यापैकी एकाही खासदाराने १००% निधीचा वापर केलेला नाही, हे या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे निधी मिळत नव्हता, या आरोपांपेक्षा उपलब्ध निधीचा किती प्रभावी वापर झाला, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT