Crime News  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 Final Result : खळबळजनक! बुलढाण्यात NCP शरद पवार तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Maharashtra Assembly Election 2024 Final Result : सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून बैठका सुरु आहेत. सत्ता स्थापनेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची दिल्लीवारी होणार आहे. २७ किंवा २८ तारखेला सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. याबाबतच आज महायुतीचे नेते नेमका काय निर्णय घेणार याबाबतच्या सर्व अपडेट जाणून घेऊया.

Mangesh Mahale

तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी(ता.26) घडली आहे. तालखेड गावाच्या हद्दीत हा हल्ला करण्यात आला आहे. वेगवेगळ्या दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्या राज्यपालांची भेट घेणार?

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ मंगळवारी (ता.26) संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार असल्याची असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत ते जबाबदारी पार पाडतील. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून राज्यात सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शाहांच्या उपस्थितीत गटनेता निवडला जाणार?

निरीक्षक म्हणून अमित शाह उद्याच मुंबईत जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे.त्यानंतर अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

विधानसभा निवडणूकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेची दरमहा रक्कम लवकरच 2100 केली जाणार असल्याची चर्चा आहे. सत्तास्थापनेनंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजनेची रक्कम 1500 वरुन 2100 करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.ज्या योजनेनं महायुतीला यश दिले त्या योजनेबाबत दिलेले आश्वासन महायुती लवकरच पूर्ण करणार असलेच्या महायुतीचे नेते सांगत आहेत.

Aditya Thackeray News: भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.आदित्य ठाकरे यांची पक्षाचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे, भास्कर जाधव गटनेतेपदी यांनी , तर सुनील प्रभु यांची पुन्हा प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली आहे.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचे नाव फायनल,शिंदेंचे काय?

भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडावा, यासाठी दिल्लीतून भाजपश्रेष्ठींकडून शिंदेंवर दबाव येत असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.

Devendra Fadnavis CM OF Maharashtra: फडणवीसांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे. आज सांयकाळपर्यंत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येत आहे.

Ajit Pawar on Sharad Pawar: घरातच उमेदवारी द्यायला नको होती...

बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना पराभवाची धूळ चारली. पवार विरुद्ध पवार या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावर अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामतीत घरातच उमेदवारी द्यायचा नको होती, असे विधान केले. ते कराड येथे बोलत होते. युगेंद्र यांच्या उमेदवारीवर ते म्हणाले, 'मी लोकसभा निवडणुकीला माझी चुक झाली, घरात उमेदवारी द्यायला नको होती, असे मी म्हटलं होते. त्यानंतरही विधानसभेत माझ्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली, घरातच उमेदवारी द्यायला नको होती, असे सांगत अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

Nana Patole resigned Congress Maharashtra State President:  विधासभेतील अपयशानंतर पटोलेंचा मोठा निर्णय 

विधानसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला आहे, ते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

CM OF Maharashtra : नवीन चेहऱ्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ?

महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून दोन फॉर्म्युल्यावर चर्चा होत आहे. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला दिल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2-2-1, असा फॉर्म्युला दिल्याचे सूत्रांची माहिती आहे. भाजप आणि शिवसेनाला प्रत्येकी दोन वर्षे आणि राष्ट्रवादीला एक वर्षे, मुख्यमंत्रीपदावर संधी दिली जाऊ शकते. परंतु दिल्लीत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील महायुतीकडून या फॉर्म्युल्याची चर्चा फेटाळण्यात आली आहे. परंतु भाजपचा पूर्णवेळ मुख्यमंत्रिपद जाऊ शकते आणि त्यासाठी नवीन चेहरा पुढे येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महायुतीमधील पहिलं मुख्यमंत्रिपद कोणाला मिळेल, याची उत्सुकता आहे.

Winter Session Of Parliament From Today :  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु होत आहे. ता. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. अधिवेशनात पाच नवे विधेयक मांडले जाणार आहे. वक्फ (संशोधन) विधेयकांसह 11 विधेयकांवर चर्चा होणार आहे. एकूण 16 विधेयक अधिवेशनात मांडले जाणार आहे. या विधयकांना मंजुरी देण्याची तयारी सत्ताधारी भाजपने तयारी केली आहे. उत्तर भारतात वाढलेली प्रदुषणांची पातळी, मणिपूर हिंसाचार, गौतम अडाणी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल आदी मुद्यांवर विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत

Yashwantrao Chavan Death Anniversary today: शरद पवारांकडून यशवंतराव यांना अभिवादन

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांची आज पुण्यतिथी आहे. यशवंतराव चव्हाण यांनी शेती, उद्योग, शिक्षण, सहकार, सिंचन या क्षेत्रात मोठं काम केलं आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते हजेरी लावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रितीसंगमावर येऊन यशवंतरावांना अभिवादन केले.

Ajit Pawar visit TO Karad: अजित पवार यांचा आज कराड दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कराड येथे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहे.आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बैठक आहे तर मनसेची आज मुंबईत शिवतिर्थावर बैठक होणार आहे. महायुती लवकरच सत्ता स्थापन करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT