Ajit Pawar’s wife Sunetra Pawar meets Kangana Ranaut in Delhi, sparking claims of attending an RSS event. She denies knowledge of the event. Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची खरंच RSS च्या कार्यक्रमाला हजेरी? कंगणा रानौतच्या घरी नेमकं काय घडलं?

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिल्लीतील कंगना रानौत यांच्या घरी भेट दिल्यानंतर RSS कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा दावा समोर आला. मात्र सुनेत्रा पवार यांनी हे नाकारले.

Hrishikesh Nalagune

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा दावा केला जात आहे. भाजप खासदार कंगना रानौत यांच्या दिल्लीतील घरी त्यांनी भेट दिली. यानंतर रानौत यांनी एक्सवरून फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली. मात्र "आपण या कार्यक्रमासाठी गेलो नव्हतो. या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काहाही माहिती नव्हते", अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.

कंगना रानौत यांनी काय माहिती दिली?

आज माझ्या निवासस्थानी 'राष्ट्र सेविका समिती' महिला शाखेचे आयोजन करण्यात आले होते. आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक दृढ बनवू. आपण सर्वांनी मानव सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत काम करण्याचा संकल्प केला आहे. महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्राला बलवान बनवतो, असे ट्विट रानौत यांनी केले आहे.

यावेळी खासदार रानौत यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. यातील एका फोटोत खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित राहिल्याचं दिसून येत आहे. यात काही महिला खाली बसल्या आहेत, समोर गुरु बसले असून त्यांच्या शेजारी केशव बळीराम हेडगेवार आणि माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांचे फोटो दिसत आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.

सुनेत्रा पवार यांनीही या भेटीबाबत त्यांच्या सोशल मीडियामधून या भेटीबाबत माहिती दिली होती. पण त्यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली नव्हती. लोकसभा खासदार कंगना रानौत यांच्या घरी आज स्नेहपूर्वक कौटुंबिक भेट झाली. या भेटीमध्ये परस्परांमध्ये स्नेहपूर्वक संवाद साधले गेले व आपुलकीचे क्षण अनुभवता आले, असे त्यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितले होते. मात्र आता त्यांनी ही पोस्ट डिलीट केल्याचे दिसत आहे.

सुनेत्रा पवार आणि अजित पवार काय म्हणाले?

याबाबत टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, "राष्ट्र सेवा समिती संघाची बैठक आहे किंवा संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम आहे हे माहिती नव्हते. स्नेहमिलनासाठी बोलावलं होतं त्यामुळे शुभेच्छुक भेटीसाठी गेले होते", असेही त्यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वर्धा इथे बोलताना यावर भाष्य केले आहे. "मला माहिती नाही, मी आता माहिती घेतो. पण माझी बायको कुठे जाते याची मिनिट टू मिनिट माहिती घेत नाही", असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT