Nanded flood Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: काळजी घ्या! तीन दिवस पावसाचे, ऑरेज, रेड अर्लट; पूर परिस्थिती निर्माण झाल्यास 'या' क्रमांकांवर संपर्क साधा!

Maharashtra Rain Alert Heavy Showers For Next 3 days:कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ता. 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून 28 सप्टेंबरला काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale
  1. 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज.

  2. 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता.

  3. हवामान विभागाने ऑरेंज व रेड अलर्ट जारी करून प्रशासन व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस (ता.२७ ते २९ सप्टेंबर)राज्यात ऑरेज आणि रेड अर्लट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अनुमानुसार संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलल्याने नागरिकांनी आपत्कालीन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ता.२७ ते २९ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून २८ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून नागरिकांना आवाहन

  • पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना, रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.

  • पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी.

  • पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.

  • पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे.

  • नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत सूचनांचे पालन करावे.

  • धोकादायक भागात जाणे टाळावे.

  • पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे.

  • वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.

पूर परिस्थितीची शक्यता असलेल्या जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक-

  1. नांदेड-०२४६२-२३५०७७

  2. सोलापूर- ०२१७-२७३१०१२

  3. धाराशीव-०२४७२-२२७३०१

  4. बीड-०२४४२-२९९२९९

  5. परभणी-०२४५२-२२६४००

  6. अहिल्यानगर ०२४५-२३२३८४४

  7. गडचिरोली-०७१३२-२२२०३१

  8. रायगड ८२७५१५२३६३

  9. रत्नागिरी- ७०५७२२२३३

  10. पालघर- ०२५२५- २९७४७४

  11. सिंधुदुर्ग-०२३६२ - २२८८४७

  12. ठाणे- ९३७२३३८८२७

  13. पुणे- ९३७०९६००६१

  14. सातारा-०२१६२ - २३२३४९

  15. कोल्हापूर-०२३१ - २६५९२३२

  16. लातूर- ०२३८२ - २२०२०४

  17. मुंबई शहर आणि उपनगर- १९१६/०२२ ६९४०३३४४.

मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी हे चोवीस तास (२४X७)उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांक: ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.

प्रशासनाची तयारी

  • राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

  • अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

  • आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

FAQ

Q1. महाराष्ट्रात पावसाचा इशारा कोणत्या तारखांसाठी दिला आहे?
👉 २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान.

Q2. कोणत्या भागात सर्वाधिक पावसाचा धोका आहे?
👉 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात.

Q3. २८ सप्टेंबर रोजी काय विशेष आहे?
👉 काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Q4. प्रशासनाने नागरिकांना कोणते आवाहन केले आहे?
👉 सतर्क राहावे आणि गरज पडल्यास आपत्कालीन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT