Maharashtra Disaster Management : राज्यात 1 जून ते 8 जुलै या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये 63 जणांचा मृत्यू, तर 78 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारच्या निकषानुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना दिली.
दरम्यान, या भीषण परिस्थितीमुळे व वारंवार उद्भवणाऱ्या दुर्घटनांमुळे राज्य आपत्ती व्यवस्थापनयंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजपचे (BJP) मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत वीज पडून 23, दरड कोसळून 6, पुराच्या पाण्यात वाहून 3, झाड पडून 6 आणि भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पावसाशी संबंधित घटनांमध्ये 200 जनावरांचा मृत्यू, तर 10 जनावरे जखमी झाली आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सरकारकडून कोणतीही हलगर्जी झालेली नसल्याचा दावा केला. गेल्या पाच दिवसांपासून आपण स्वतः विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त आणि स्थलांतरित नागरिकांसाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थलांतरित नागरिकांना पुढील 15 दिवस पुरेल इतक्या धान्याचे किट देण्यात आले असून, पालघर जिल्ह्यात एक हजार नागरिकांना मदत साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.
याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सात जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी विधानसभेत दिली. सत्ताधाऱ्यांनी या अतिवृष्टीतून उद्भवलेल्या परिस्थितीवर राजकारण न करण्याची मागणी केली असली, तरी आपत्ती व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.