Chhagan Bhujbal,Sunetra Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या शर्यतीत राष्ट्रवादीच्या 'या' 4 बड्या नेत्यांची नावे आघाडीवर! भुजबळांचा पत्ता कट? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय!

NCP Rajya Sabha Candidates News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत काही नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या आठवड्यात पक्षाकडून उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sachin Waghmare

Mumbai News : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाकडून आता या राज्यसभेच्या या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील या एकमेव जागेसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इच्छुकांची संख्या मोठी आहे. पण मंत्री भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला असून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार जण इच्छुक असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत उमेदवारांच्या नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या आठवड्यात पक्षाकडून नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला राज्यसभेवर पाठवून राज्य मंत्रिमंडळातील जागा पुतणे समीर भुजबळ यांना द्यावी असा हट्ट त्यांनी धरला आहे.

भुजबळ यांच्या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्था दिऊन येत आहे. कारण पुतणे समीर भुजबळ यांना मंत्री केल्यास त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून येणे बंधनकारक ठरते. अशावेळी छगन भुजबळ आमदार असलेल्या येवला पोटनिवडणुकीत समीर हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे भुजबळांच्या घरात एक खासदारकी आणि समीर भुजबळ हेही निवडून आल्यास दोन आमदारकी अधिक एक मंत्रिपद अशी पद येऊ शकतात.

यामुळे सध्या पक्ष भुजबळ यांना केंद्रात पाठवण्यासाठी फारसा इच्छुक नसल्याचे समजते. भुजबळ यांच्याऐवजी राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीमधील 3 ते 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. सुबोध मोहिते हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. मोहिते आणि अविनाश आदिक या दोघांनाही संघटनेत नुकतेच राष्ट्रीय सरचिटणीस पद देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT