Pratap Sarnaik announcement Sarkarnama
महाराष्ट्र

Pratap Sarnaik announcement : 250 कोटी कमवायचेच…! परिवहन मंत्र्यांचा प्लॅन ठरला!

Transport Minister Pratap Sarnaik announces ambitious revenue plan for MSRTC through advertising initiatives : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला पुढील पाच वर्षांत जाहिरातीच्या माध्यमातून 250 कोटी उत्पन्न मिळवण्याचा प्लॅन केला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra ST Corporation : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी, 'लालपरी'ला वेग देण्याबरोबर महसूलवाढीसाठी मोठं टार्गेट ठेवलं आहे. उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे पर्याय वापरण्यासह प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यावर देखील भर दिला आहे.

यातनूच, पुढील पाच वर्षांत एसटी महामंडळाने जाहिरातीच्या माध्यमातून 250 कोटी रुपये कमवायचेच, असं टार्गेट ठेवलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तशी घोषणाच केली आहे.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Transport) मुख्यालयात संचालक मंडळाच्या बैठकी झाली. यात मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत केलं. या बैठकीत मंत्री सरनाईक चांगलेच आक्रमक होते. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवायचेच, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.

मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, "एसटी महामंडळाची 259 आगारे आणि 610 पेक्षा अधिक लहान-मोठी बसस्थानके आहेत. राज्यभर पसरलेली ही बसस्थानके महामंडळाचं उत्पन्न वाढीचं मोठी केंद्र आहेत. तसंच सुमारे 12 हजार बसेसच्या ताफ्या‌द्वारे दररोज 50 ते 55 लाख प्रवाशांचा प्रवास होतो. भविष्यात बससंख्या वाढल्यानंतर ही दैनंदिन प्रवासी संख्या एक कोटींपर्यंत जाईल." अशा व्यापक पोहोच असलेल्या माध्यमावर जाहिरात देणे म्हणजे उत्पादकांसाठी सुवर्णसंधीच आहे, याकडे मंत्री सरनाईक यांनी लक्ष वेधलं.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची लालपरी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. प्रत्येक एसटी बसमागे महसूल वाढीसाठी नवीन चक्रेही फिरवली जाणार आहे. त्याचबरोबर एसटी उभ्या राहत असलेली बसस्थानके, त्यांचा परिसर यांचा पुरेपुर उपयोग जाहिरातांसाठी करण्या येणार आहे. एसटी बसचा आतील, तसंच बाहेर भागांचा देखील जाहिरातींसाठी वापर करण्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष वेधलं.

स्पर्धात्मक निविदा धोरण...

यातूनच मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा जाहिरात महसूल वाढीचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. पुढील पाच वर्षांत 250 कोटींहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

एसटी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणार

एसटी महामंडळाला सध्याच्या जाहिरातींद्वारे दरवर्षी सुमारे 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात थेट दुपटीने वाढ होईल. अशाप्रकारे, तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झाले, तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT