Maharashtra Recruitment Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Recruitment : सरनाईक-पाटलांचा मोठा निर्णय! भरतीचा पेटारा उघडला; इच्छुकांनी तयारीला लागा

Ministers announced large-scale recruitment in Maharashtra State Transport and Higher & Technical Education departments, creating over 22000 government job opportunities : एसटी महामंडळ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागात भरती प्रक्रिया सुरवात करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra government jobs 2026 : महाराष्ट्रात नोकर भरतीचा पेटारा उघडला गेला आहे. एसटी महामंडळात 17742 जागांवर कंत्राटी तर, उच्च व तंत्रशिक्षण विभागात 5012 पदांची भरती होणार आहे.

एसटी महामंडळातील कंत्राटी भरतीची मंत्री प्रताप सरनाईक यांनी तर, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील भरती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याचवेळी त्यांनी एसटी महामंडळात करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरतीबाबत अपडेट दिली. ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर कर्मचारी पदावर कंत्राटी पद्धतीने भरती राबवली जाणार आहे.

एसटी महामंडळात (MSRTC) 17742 जागांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. याशिवाय महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी पद्धतीने भरती होईल. नियमित कर्मचाऱ्यासाठी अर्थ खात्याकडे अर्ज पाठविण्यात आला आहे.

शिस्तभंगाच्या कारवाईत पारदर्शकता ठेवा

चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगारस्तरावरील निर्णयप्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत दिले.

अनुदानित महाविद्यालयात भरती

राज्यातील उच्च शिक्षण विभागातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या मोठ्या भरतीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून तब्बल 5012 पदे भरली जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. 2026-27 च्या अर्थसंकल्पातील अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

भरती प्रक्रिया लवकर...

राज्यातील सुमारे 1200 अनुदानित महाविद्यालयांमध्ये 5400 प्राध्यापक पदांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांमध्येही 700 प्राध्यापकांची भरती होणार असून एकूण मिळून 6 हजारांहून अधिक पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT