थोडक्यात बातमी :
राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांच्या पगारवाढीचा तिढा शरद पवार यांच्या मध्यस्थीने सुटला आहे.
त्रिपक्षीय समितीने 1 एप्रिल 2024 पासून 10 टक्के वेतनवाढ मंजूर केली असून ती पुढील पाच वर्षांसाठी लागू असेल.
कामगारांना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै या कालावधीसाठीचा वेतन फरकही मिळणार आहे.
Someshwarnagar News : राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांच्या वेतनवाढीचा तिढा गेल्या सव्वा वर्षापासून सुटलेला नव्हता. पण आता साखर कामगारांसाठी गोड बातमी असून हा तिढा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. शरद पवार यांनी पुढाकार घेताच दहा टक्के वेतनवाढ देण्यासाठी त्रिपक्षीय समितीने मंजुरी दिली आहे. ही वेतनवाढ 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2029 या पाच वर्षे कालावधीसाठी केलेली आहे. त्यामुळे आता 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै या सोळा महिन्यांच्या कालावधीतील फरक देखील कामगारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील उस तोड कामगारांची गेल्या सव्वा वर्षापासून वेतनवाढीची मागणी होती. यासाठी सुमारे दीड लाख साखर कामगारांनी लढा सुरू ठेवला होता. पण त्यांची मागणी काही पूर्ण होत नव्हती. पण शरद पवार यांनी यात मध्यस्थी करत प्रश्न मार्गी लावला.
1 एप्रिल 2024 मध्येच राज्यातील साखर कामगारच्या वेतनवाढीची मुदत संपल्याने कामगार संघटनांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केली होती. दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये राज्यसरकारने त्रिपक्षिय समिती गठित करण्याचा निर्णय घेत ती समिती नियुक्त केली होती. या समितीच्या चार वेळा बैठकाही झाल्या. पण त्यावर तोडगा काही निघाला नव्हता.
त्यानंतर याबाबत समितीने हा प्रश्न शदर पवार यांच्या कोर्टात ढकलला. त्यावर तीन दिवसांपूर्वी (ता.14) मुंबई येथे साखर कामगार, कारखानदार आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. ज्यात सर्व बाबींचा विचार करण्यात आला. तर एक मताने साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय झाला. या निर्णया प्रमाणे 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. तर हा तोडगा राज्यातील सर्व खासगी व सहकारी कारखान्यांना लागू असेल.
आगामी साखर हंगामदेखील आता सुरू होणार असून त्याआधीच याचा निर्णय झाला आहे. यामुळे राज्यातील साखर कारखानदारांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तर आता कारखान्यांना वार्षिक दोन ते अडीच कोटींची अधिकची तरतूद करावी लागणार आहे.
दरम्यान यावरून साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, शरद पवार यांनी चांगला मध्यममार्ग काढला असून 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ समाधानकारक असून या वेतनवाढीने साधारणपणे चार हजार रुपये मिळतील. फरकाची रक्कम एकरकमी की टप्प्यात याचा निर्णय स्थानिक कामगार संघटना घेतील, असेही राज्याध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी म्हटलं आहे.
प्र. साखर कामगारांची वेतनवाढ कधीपासून लागू होणार आहे?
उ: 1 एप्रिल 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी (31 मार्च 2029 पर्यंत) ही वेतनवाढ लागू असेल.
प्र. या वेतनवाढीत काय आहे?
उ: कामगारांना 10% वेतनवाढ देण्याचा त्रिपक्षीय समितीचा निर्णय झाला आहे.
प्र. मागील पगाराचा फरक मिळेल का?
उ: होय, 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै या कालावधीतील पगार फरकही कामगारांना मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.