Maharashtra Teacher Shalarth EKYC Salary Update AI
महाराष्ट्र

Teacher Shalarth EKYC: शिक्षकांनो सावधान! 20 सप्टेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा पगार मिळणार नाही!

Maharashtra Teacher Shalarth EKYC Salary Update:ज्या कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन बिल सिस्टीममध्ये तयारच होणार नाही (Validation) अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

Mangesh Mahale
  • नवी मुदत: शालार्थ प्रणालीत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ मिळाली आहे.

  • वेतनावर कारवाई: २० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास ऑक्टोबर २०२६ चे वेतन (नोव्हेंबरमध्ये देय) रोखले जाईल.

  • अंतिम इशारा: यापुढे ई-केवायसीसाठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही.

Pune News: राज्यभरातील खाजगी शाळांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शालार्थ प्रणालीमध्ये (Shalarth System) कर्मचाऱ्यांचे 'ई-केवायसी' (e-KYC) पूर्ण करण्यासाठी आता २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने (प्राथमिक व माध्यमिक) परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे.

मुदतवाढ का देण्यात आली?

यापूर्वी ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, विभागीय व क्षेत्रीय स्तरावर आढावा घेतला असता, सर्व कर्मचाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता दिसून आली. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ही अंतिम मुदतवाढ दिली आहे.

२० सप्टेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ नाही!

शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. २० सप्टेंबर २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर २०२६ चे वेतन (जे नोव्हेंबर २०२६ मध्ये दिले जाते) दिले केले जाणार नाही. तसेच यापुढील काळात ई-केवायसीसाठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही."

शाळांना तात्काळ सूचना देण्याचे आदेश

या निर्णयाची गंभीर दखल घेऊन सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, मुंबईचे शिक्षण निरीक्षक आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना तात्काळ सूचना द्याव्यात, असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत.

महाआयटीलाही तांत्रिक बदलांच्या सूचना

शालार्थ प्रणालीची तांत्रिक जबाबदारी असलेल्या 'महाआयटी'ला (MahaIT) देखील याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रणालीमध्ये ई-केवायसीसाठी आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे आणि ज्या कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन बिल सिस्टीममध्ये तयारच होणार नाही (Validation) अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT