महाराष्ट्रात विधान परिषदेच्या आणखी 9 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 अशी निश्चित करण्यात आली आहे.
या 9 जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असल्यामुळे ही निवडणूक आवश्यक ठरली आहे. सध्या राज्यात बारामती आणि राहुरी येथे पोटनिवडणुका देखील होत आहेत, त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, ज्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांच्या जागांवर आता नव्याने निवडणूक होणार असल्याने, अनेक इच्छुक नेत्यांनी तयारी सुरू केली आहे.
विधानसभेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता, या 9 जागांपैकी भाजपला सुमारे 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मते असल्यामुळे जर महायुतीने अतिरिक्त उमेदवार उभा केला, तर ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिनविरोध निवड होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
एकाच दिवशी मतदान आणि निकाल जाहीर होणार असल्यामुळे ही निवडणूक जलदगतीने पार पडणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.