MLC Election Results : राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला तीन जागा गमवाव्या लागल्या. सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत यावरून वादंग सुरू झाला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभावाला एकनाथ शिंदे शिवसेनेला जबाबदार धरले आहे.
अजित पवार राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी देखील एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनाथ बन यांच्यावर अख्खी एकनाथ शिंदे शिवसेना तुटून पडली असून, विदर्भातील शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांच्यापाठोपाठ रत्नागिरीतील नेते आमदार नीलेश राणे यांनी नवनाथ बन यांना चांगलेच सुनावले आहे.
नवनाथ बन यांनी शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती, असे एका वाक्यात नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी फटकारले आहे. विधान परिषदेच्या निकालावरून, महायुतीमधील मित्रपक्ष एकमेकांना सल्ले देण्यात गुंतले आहे. निवडणुकीत जेन-झी प्रभाव मान्य करताना, आपआपसात भांडत बसलो, तर त्याचे काय परिणाम होतात, हे निकालातून दिसू लागले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी उघडपणे विरोधात प्रचार केला मग, युतीचा अर्थ काय? असा प्रश्न केला जात आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेमुळे पुण्यात भाजप (BJP) उमेदवाराचा पराभव झाला, असे खापर फोडत नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला नवनाथ बन यांनी दिला. तसेच महायुतीच्या धर्माविरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न केला. यावरून एकनाथ शिंदे शिवसेनेने सर्वच जागा भाजपने लढवायच्या का? हे चुकीचे असून मित्रपक्षांनाही मान द्यायला हवा, असे प्रत्युत्तर देण्यात आले.
नवनाथ बन यांनी, पुणे, छत्रपती संभाजीनगरमधील भाजप उमेदवाराच्या पराभवावरून, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेकडे लक्ष वेधले. तसेच काय कारवाई करणार? असा प्रश्न केला. अजित पवार राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी, छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचा उमेदवार हा पक्षाचा सदस्यही नव्हता, बाहेरच्या उमेदवारामुळे भाजपमध्येच नाराजी होती, असा आरोप एकनाथ शिंदे शिवसेनेने केला आहे. विधानसभा निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी भाजपचे प्रशांत बंब यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता, याची आठवणही एकनाथ शिंदे शिवसेनेने करून दिली. भाजपने आधी स्वतःच्या चुकीच्या रणनीतीचे आणि पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रवक्त आनंद परांजपे यांनी दिला. मंत्री उदय सामंत यांनी देखील भाजप प्रवक्त्यांनी एकनाथ शिंदेंना सल्ला देण्याचे भलते उद्योग करू नये, असे म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.