Prakash Ambedkar VBA Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Breaking News Live Updates : प्रकाश आंबेडकरांचे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

MaharashtraPolitics News 08 December 2024 Live Updates: फडणवीस सरकारच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज विरोधी पक्षाचे आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे. देशातील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Mangesh Mahale

प्रकाश आंबेडकरांनी विचारले तीन प्रश्न

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (6 डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त करत तीन प्रश्न विचारले आहेत

मत देण्यासाठी लागणारा वेळ, जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते !संध्याकाळी 6 या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील?

जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग ऑफिसर यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:59 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास, त्याचा तपशील?

आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. असे आंबेडकरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Pankaja Munde Meet Devendra Fadanvis : पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आज (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी भेट घेतल्याची माहिती आहे.

MVA Mla Oath : जितेंद्र आव्हाड, नाना पटोले यांनी घेतली शपथ

शनिवारी (ता. 7) नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. मात्र, या शपथविधीवर महाविकास आघाडीतील आमदारांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, आज (रविवारी) मविआच्या जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह सर्वच आमदारांनी शपथ घेतली.

Rahul Narvekar to become assembly speaker: राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज

विधानसभा अध्यक्षांसाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यांची बिनविरोध निवड होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर नार्वेकरांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. "कुठल्याही गोष्टीची जबाबदारी दिली जाते तेव्हा मेरीटवर दिली जाते. आणि त्यातून माझी निवड झाली आहे," असे नार्वेकर म्हणाले. कोणताही पक्षपात न करता निर्णय घेईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde ON EVM : लोकसभेच्या वेळी हा आक्षेप का घेतला नाही?

पराभव झाल्यावर आघाडीतील नेते म्हणतात, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा आक्षेप का घेतला नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ईव्हीएमबाबतचे रडगाणे आता बंद करा, विकासगाणं म्हणा, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Rahul Narvekar to become assembly speaker : राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा होणार विधानसभेचे अध्यक्ष?

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांंनी आज अर्ज भरला. त्यांच्या नावाची घोषणा होणे, बाकी असल्याचे बोलले जाते. नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होतील तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा झाली आहे. आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर लगेच आघाडीचे नेते एकत्रित बसून विधानसभा अध्यक्षपदासाठी फॉर्म भरणार की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Special Session: विरोधकांचा सभात्याग; बावनकुळे संतापले

Mumbai News: विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधकांनी अधिवेशनात सभात्याग केला. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार देणे, या संविधानाचा अपमान असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Chandrasekhar Bawankule ON Sahard Pawar: आघाडीच्या विजयी आमदारांनी राजीनामा द्यावेत; बावनकुळेंचे आव्हान

विधानसभा निवडणुकीतील अपयश लपवण्याचे काम शरद पवार, राहुल गांधी करीत आहेत. पवारांबाबत मला आदर आहे पण ईव्हीएमबाबत पवारांनी नौटंकी करु नये, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आघाडीचे जे उमेदवार ईव्हीएममुळे विजयी झाले आहेत, त्या सर्वांना राजीनामा द्यावेत, असे आव्हान बावनकुळे यांनी केले आहे. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

Sharad Pawar Visit Markadwadi: शरद पवार यांचा आमदार दोन दिवसात राजीनामा देणार; काय आहे कारण?

Uttam Jankar

ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मारकडवाडीला आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होत आहे. प्रदेशाध्यश्र जयंत पाटील उपस्थित आहेत. मारकडवाडीला छावणीचे स्वरुप आले आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठ विधान केले आहे. निवडणूक आयोगाकडून पत्र घेणार असून येत्या दोन दिवसात मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे जानकर यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले.

बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, असे विनंती जानकर आयोगाला करणार आहेत. आयोगाने परवानगी दिली नाही, तर सुप्रिम कोर्टात जाणार, अशा इशारा जानकर यांनी दिला. विधानसभेला झालेल्या मतदानाबाबत गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. या गावात भाजपला 1003 मतं तर तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 843 मतं मिळाली. हे येथील गावकऱ्यांना मान्य नाही. या गावात 80 टक्के मतदान हे धनगर समाजाचे आहे. विद्यमान आमदार उत्तम जानकर हे याच समाजाचे आहे.  असं असताना ही उत्तम जानकर या गावात पिछाडीवर होते. हे कसे काय झाले असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Maharashtra Cabinet Expansion Will Be Delayed: मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? हे आहे कारण 

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार ११ व १२ डिसेंबर होण्याची शक्यता कमी आहे, कारण मंत्र्यांच्या नावांची निवड करताना तीनही घटक पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी निवडलेल्या नावे, केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्यावर चर्चा झाल्यानंतर केंद्र सरकार ती मंजुर करणार असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष अधिवेशनाचा उद्या (ता. ९) शेवटचा दिवस आहे. एका दिवसात ही प्रक्रिया होणार नाही, त्यामुळे सध्यातरी ११-१२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे चित्र आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Fake Notes Found :  बनावट नोटा, अकोल्यात दोन  जणांना अटक

Election 2024

विधानसभा निवडणुकीत पैशाचा महापुर आला होता, आता निवडणुका संपल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी बनावट नोट वाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अकोल्यात पोलिसांना कोट्यवधींच्या बनावट नोटा आढळल्या आहेत. या नोटा निवडणुकीत वाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पंढरपुरातही कोट्यवधीचा बनावट नोटा सापडल्या आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या नोटा आढळल्या होत्या आहेत. यातील अनेक नोटा या बनावट असल्याची माहिती समोर येत आहे. मतदारांना वाटण्यात आलेल्या नोटा बनावट असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar Visit Markadwadi:शरद पवार आज मारकडवाडीला जाणार; बॅलेटवरुन बॅटल रंगणार

Sharad Pawar

मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते असल्याचे समोर आल्याने अंतर त्यांच्या पक्षाने यावर आक्षेप घेतला होता. ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मारकडवाडीला आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने या गावात दाखल होणार आहेत. पवार येणार असल्याचे मारकडवाडीला छावणीचे स्वरुप आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT