Rahul Gandhi  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : ओबीसी उमेदवारांसाठी राहुल गांधी आग्रही

The second list of Congress will be announced : आज काँग्रेसची महत्वाची स्क्रिनिंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर आज किंवा उद्या काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandi : ओबीसींना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे

ओबीसीतील दुर्लक्षित जातींना उमेदवारांच्या यादीत स्थान द्या, ओबीसींच्या जागांवर विशेष लक्ष द्या. आपण जातीय जनगणना आणि ओबीसी मुद्यावर आक्रमक आहोत त्यामुळ त्यांना प्रतिनिधित्व मिळाल पाहिजे,असा सूचना राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना दिल्लीतील स्क्रिनिंग समितीच्या बैठकीत दिल्या आहेत.

Sudhir Salvi : सुधीर साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन

शिवडी मतदारसंघातून सुधीर साळवी इच्छुक आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी येथून अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुधीर साळवी उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना तातडीनं मातोश्रीवर भेटायला बोलावले आहे. नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी साळवींना बोलावलं तर दुसरीकडे लालबागमघ्ये साळवींच्या समर्थनार्थ मोठी गर्दी झाली आहे. सुधीर साळवी आणि माजी नगरसेवक सचिन पडवळ मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

raj thackeray

MNS Candidate List  : मनसेचे पाच उमेदवार जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कसबा मतदरासंघातून गणेश भोकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कसब्यामधून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर उमेदवार असणार आहेत. भाजपने अजून कसब्यातून उमेदवार जाहीर केला नाही. मनसेने जाहीर केलेल्या यादीमध्ये चिखलीमधून गणेश बरबडे, कोल्हापूर उत्तरमधून अभिजित राऊत, केजमधून रमेश गालफाडे तर कलीनामधून संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कागलच राजकारण पेटलं, दोन गटात हाणामारी

कागल मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा सामना होतो आहे. मुश्रीफ आणि घाटगे दोघांचे समर्थक आपला नेता विजयी होईल, असा दावा करत आहेत. मात्र, या दाव्याचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन्ही गटाचे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्यामध्ये वाद होत दोन नेत्यांच्या समर्थकांनी रस्त्यात हाणामारी केली.

Parivartan mahashakti : 'परिवर्तन महाशक्ती' पटली नाही, राजू शेट्टींचे पदाधिकारी नाराज

राजू शेट्टी यांचा 'परिवर्तन महाशक्ती'चा प्रयोग त्यांच्याच संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पटला नाही. आज होणाऱ्या 23 व्या ऊस परिषदेला स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच दांडी मारली आहे. संघटनेचे नेते प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी वेगवेगळी कारणे देत ऊस परिषदेला आले नाहीत. वास्तविक शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेलाच एक प्रकारे विरोध केला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

MVA समाजवादी पक्षाकडून तीन जागांची मागणी 

महाविकास आघाडीतील जागांचा तिढा अजुनही सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारखी 29 सप्टेंबर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जागांचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेट घेण्यासाठी आले आहेत. तर, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी देखील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. समाजवादी पक्षाला 3 जागा हव्या आहेत. याबाबत ते शरद पवारांशी चर्चा करणार आहेत.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis

Eknath Shinde : पुन्हा महायुतीचेच सरकार येईल..

शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. लवकरच दुसरी देखील उमेदवारी यादी जाहीर होईल. महायुतीमध्ये जागावाटपावर वाद असल्याचे बोलले जाते मात्र यामध्ये तथ्य नाही. महायुती वाद विवाद नाही. महायुतीमध्ये चांगल वातवारण आहे.विकास आणि कल्याणकारी योजना यांचे सांगड घालण्याचे काम आम्ही केले. त्यामुळे निवडणुकीत पोहोचपावती देतील. पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Vinay Kore

Vinay Kore : विनय कोरेंच्या घोषणेमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरेंनी विधानसभेला उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय छोट्या घटक पक्षांना वगळून काहीही करता येणार नाही हे लोकसभा निवडणुकीत दिसलं आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Bala Nandgaonkar : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न केले होते

राज ठाकरेंचे शिलेदार मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न केले होते. पण दुर्दैवाने तसंच झालं नाही. मात्र, भविष्यात ते दोघे एकत्र येणार हे मात्र नक्की, असा दावा त्यांनी केला आहे.

Devendra Fadnavis Filing nomination nagpur south west assembly: शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या फुटीनंतर यंदाची निवडणूक फडणवीसांसाठी मोठे आव्हान

जोरदार शक्तिप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. फडणवीस यंदा सलग सहाव्यादा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारी यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.अर्ज भरण्यापूर्वी फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरी जात आशीर्वाद घेतले. गडकरी कुटुंबीयांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले.

Mahavikas Aghadi Seat Sharing Vijay Wadettiwar:  आघाडीचं जागावाटप अद्याप अपूर्ण..

महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. अनेक जागांवरून आघाडीत वाद आहेत. शिवाय 85-85-85 चा फॉर्म्युला काँग्रेसला मान्य नसल्याची चर्चा आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला शंभरपेक्षा जास्त जागा मिळतील असं सांगितलं आहे. शिवाय उमेदवारांची दुसरी यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर होईल असंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra Vidhan Sabha Election:राज्यातील जनतेला सक्षम पर्याय

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 'परिवर्तन महाशक्ती'ची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष व समविचारी नेत्यांनी एकत्र येवून राज्यातील जनतेला सक्षम पर्याय दिला आहे. 'परिवर्तन महाशक्ती' मधील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती च्या २८ जागांची निश्चिती झाली आहे तर लवकरच स्वाभिमानी पक्षाच्या देखील जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

Ajit Pawar, Baba Siddique, Zeeshan Siddique

Zeeshan Siddiqui Join NCP : झिशान सिद्दीकी यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. निशिकांत पाटील, भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. तसंच बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनीही यावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज भरणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहाव्यांदा दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्यासोबत पूर्व नागपूरचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, दक्षिणचे मोहन मते हे उमेदवारही आपला अर्ज दाखल करणार आहेत.

Congress Candidate Second list : आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होणार

काँग्रेसने गुरूवारी (ता24) आपली पहिली 48 जणांची उमेदवारी यादी जाहीर केली. या यादीत नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, रविंद्र धंगेकर आदी दिग्गजांची नावे आहेत. तर आज काँग्रेसची महत्वाची स्क्रिनिंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर आज किंवा उद्या काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT