Eknath Shinde Shivsena  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : एकनाथ शिंदेंनी टायमिंग साधलं; शिवसेनेची 45 जणांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics NCP shivsena candidate list 2024 will be announced: निवडणूक अर्ज भरण्यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यालयात धावपळ सुरु आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामा ब्यूरो

मोठी बातमी! शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,मुख्यमंत्री शिंदेंसह आणखी कुणा कुणाला मिळालं तिकीट ? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच भाजप, मनसेनंतर आता शिवसेनेची 45 पहिली यादी आता जाहीर झाली आहे. ट्विटद्वारे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, शंभूराज देसाई, संतोष बांगर, संजय गायकवाड यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये ४५ उमेदवारांची नावे आहेत.

मोठी बातमी! शिवसेनेच्या सर्व आमदारांना 'वर्षा' बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश

शिवसेना पक्ष कार्यालयातून सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व विद्यमान आमदारांना फोन गेले असून बुधवारी(ता.23) वर्षा बंगल्यावर सगळ्यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: या आमदारांना मार्गदर्शनही करणार आहे.

छत्रपती संभाजीनगरात 'MIM' ला मोठा धक्का; अब्दुल गफार कादरी यांचा राजीनामा 

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गफार कादरी यांनी गंभीर आरोप केले आहेत.वंचित आणि MIM युती तुटण्यामागे जलील यांचा हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.इम्तियाज जलील हे भाजपला मदत करतात,पैसे घेण्यात पुढे आहेत,ते चिटर आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. गफार कादरी हे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा विजयापासून वंचित राहिले आहेत. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे उमेदवार असलेल्या गफार कादरी हे दुसऱ्या स्थानावर होते.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी मविआने जोरदार तयारी केली आहे. संभाव्य यादीनुसार काँग्रेस पक्ष 105 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 95 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती आहे.

Shivsena

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटी ला जाण्याची शक्यता          आज गुवाहाटीला जाऊन उद्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार  असल्याची माहिती समोर येत आहे.

कारमध्ये आढळलेले सर्वजण हे सांगोल्याचे....

खेड शिवापूर टोलनाका येथे एका गाडीमध्ये आचारसंहिता पथकाला तपासणी दरम्यान पाच कोटी आढळले आहेत. कारमध्ये आढळलेले सर्वजण हे सांगोला येथील आहेत. पण शहाजीबापूंनी हा आरोप खोडून टाकला आहे. या घटनेशी माझा कुठलाही सबंध नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. आज गुवाहाटीला जाऊन उद्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार  असल्याची माहिती समोर येत आहे.

Ravindra Dhangekar

khed shivapur toll 5 crore recovered from car: कोणतीही कारवाई झाली नाही....

Pune News : खेड शिवापूर टोलनाका येथे एका गाडीमध्ये आचारसंहिता पथकाला तपासणी दरम्यान पाच कोटी सापडल्याचं निष्पन्न झालं आहे. हे पाच कोटी शिंदे गटातील आमदाराचे असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. कॉग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, जी गाडी पकडण्यात अली त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची माणसं होती. सुरुवातीला गाडीतून 15 कोटी सापडल्याचा समोर आलं होतं. मात्र त्या पंधरा कोटींचे पाच कोटी कधी झाले हे समजलंच नाही. गाडीच्या चालकाने हे पैसे शहाजी बापूंचे असल्याचे सांगितल्यानंतर देखील ते पैसे ताब्यात घेण्यात आले नाही. कोणतीही तक्रार अथवा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आचारसंहिता भंग होऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, असे ते म्हणाले.

Sharad Pawar

संदीप नाईक यांचा  शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. संदीप नाईक हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

बेलापूर मतदार संघातील

NILESH RANE.jpg

Nilesh Rane Join Shivsena: नीलेश राणे उद्या शिवसेनत प्रवेश करणार

भाजपचे नेते, माजी खासदार नीलेश राणे हे उद्या शिवसेनेत प्रवेशे करीत आहे. त्यापूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदे आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपने मला खूप दिले, पण ज्या पक्षातून माझ्या वडीलांनी राजकारणाला सुरवात केली. त्यात शिवसेनेत मी प्रवेश करीत आहे, याचं मला समाधान वाटते, असे नीलेश राणे म्हणाले.

Chetan Tupe, Nana Bhangire

 Hadapsar Assembly Election 2024: दोन्ही शिवसेनेचा हडपसरवर दावा

हडपसर विधानसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीत अजित पवार यांना सुटली आहे. पण या जागेवर शिवसेना शिंदे गटातील नेते शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे हडपसर विधानसभा मतदारसंघातून 28 तारखेला मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार आहे. शिवसेनेला हडपसर विधानसभा मतदारसंघ मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करीत आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार महादेव बाबर हेही ही जागा मिळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह करीत आहेत.

baba siddiqui | Lawrence Bishnoi.jpg

बिष्णोईला ठार मारण्यासाठी करणी सेनेकडून कोट्यवधींचं बक्षीस

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई या गँगविरोधात क्षत्रीय करणी सेनेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. जेलमध्ये असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई याला ठार मारणाऱ्यांसाठी करणी सेनेकडून कोट्यवधींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. क्षत्रीय करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून बिष्णोईला संपवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ना 1,11,11,111 चं बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर केल्याचे वृत् आहे.

Assembly Election 2024:  पुण्यात आता दररोज नाकाबंदी 

राज्यात आचारसंहिता लागू झाली असताना पुण्यात पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आजपासून दररोज नाकेबंदी करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. खेड-शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून आनंद अलकुंटे आज अर्ज भरणार

अजित पवारांची साथ सोडून हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक आनंद अलकुंटे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. शक्ती प्रदर्शन करीत ते आज अर्ज दाखल करणार

Maharashtra Politics NCP shivsena candidate list 2024 will be announced: आज राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आज आपल्या उमेदवाऱ्यांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. या याद्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. भाजपने दोन दिवसापूर्वी पहिली यादी जाहीर करुन ९९ जणांना उमेदवारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT