Tukaram Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Munde: 'तुकाराम मुंढे'मुळे अधिवेशन गाजणार; भाजपचे आमदार आक्रमक

Tukaram Munde Maharashtra Winter Session Nagpur 2025: सरकारने त्यांची "स्मार्ट सिटी प्रकल्प"चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप भाजपाचा आहे.

सरकारनामा ब्यूरो

राज्याच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. अनेक मुद्दे या अधिवेशनास गाजणार आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा मुद्दांवरुन गदारोळ होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.

नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि सरकारने त्यांची "स्मार्ट सिटी प्रकल्प"चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप भाजपाचा आहे. या कारणामुळे तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपचे आमदार अधिवेशनात करणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी देत हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असे सांगितले.

यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे.तपोवनातील वृक्षतोड, शेतकरी कर्जमाफी, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून हिवाळी अधिवेशन गाजणार आहे.

सात दिवस चालणा-या या अधिवेशनातून विदर्भातील शेतकऱ्यांना मदतीच्या मोठ्या अपेक्षा आहेत. विधिमंडळ इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेत्याविनाच सभागृहाचं कामकाज चालणार आहे. विरोधीपक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरूनही विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT