Param Bir Singh sarkarnama
महाराष्ट्र

परमबीर सिंह बेपत्ता? राज्य सरकारनं वेतन रोखलं

गृहविभागाने होमगार्ड विभागाला परमबीर सिंह (Parambir Singh) यांचे वेतन रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे (FIR) नोंदवण्यात आले आहेत. यातील ३ गुन्हे वसूलीचे तर १ गुन्हा अँट्रोसिटीचा आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. त्याच्या वेतनाबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला काही सूचना दिल्या आहेत. परमबीर सिंह यांच्यासह २५ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

मुंबईच्या आयुक्तपदावरुन गृहरक्षक दलामध्ये उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी २० मार्चला लेटर बॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) आणि राज्य सरकारला अडचणीत आणलं. परमबीर सिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. मात्र, अनेक महिने ते गैरहजर राहिल्याने कोषागार कार्यालयाने विचारणा केली होती. , एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन चंदीगडला त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर तिथूनच ते सिक लिव्ह दर १५ दिवसांनी वाढवत राहिले.त्याचं वेतन रोखलं आहे.

गृहविभागाने परमबीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकारने कारवाई करण्यास सुरवात केली असून त्याचा पहिला भाग म्हणून परमबीर सिंह यांचे वेतन रोखण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी राज्य सरकारनं केली असल्याचे समजते. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गृहविभाग आता या सर्व प्रकाराचा तपास करीत आहेत. परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी सुरु आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांचं वेतन रोखण्याबाबतचे पत्र गृहविभागाने महासंचालाकांना पाठविल्याचे सुत्रांनी सांगितले.

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी २५ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव गृहविभागाला पाठविल्यानंतर चैाकशी सुरु झाली आहे. या चैाकशीत परमबीर सिंह हे गेल्या पाच महिन्यापासून गायब असल्याची माहिती गृहविभागाला मिळाली आहे. यानंतर गृहविभागाने होमगार्ड विभागाला परमबीर सिंह यांचे वेतन रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

ते मे महिन्यात रजेवर गेले. तेव्हापासून परमबीर सिंह हे गृहविभागाच्या संपर्कात नाही. शंभर कोटी वसुलीचा तपास करणाऱ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर साक्ष देण्यासाठी परमबीर सिंह उपस्थित राहिले नाहीत. परमबीर सिंह यांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून चांदीवार आयोगाकडे शपथपत्र सादर केले आहे. ''शंभर कोटीच्या वसुलीच्या बाबतीत मला काहिही माहित नाही, मला याबाबत कुठलीही साक्ष द्यायची नाही,'' असे परमबीर सिंह यांनी या शपथपत्रात म्हटलं आहे. हे पत्र चंडीगड येथून पाठविल्याचे तपासात स्पष्ट झाले आहेत.

राज्य सरकारकडून (Maharashtra Government) परमबीर यांच्याशी पत्र व्यवहार केला असता, त्यांनी त्यांच्यावर शस्त्र क्रिया केली जाणार असल्याचे सांगत मेडिकल कागदपत्रे पाठवली. सरकारने यापूर्वी सिंग यांच्या चंडिगढ येथील घराच्या पत्त्यावर दोन वेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र कोणतही उत्तर आलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT