Girish Mahajan, Sandipan Bhumre, Sudhir mungantivar,Tanaji sawant, Narayan rane  Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election : महायुतीचं ठरलं; राहुल नार्वेकरांसह 'या' दिग्गज मंत्र्यांना उतरवणार लोकसभेच्या आखाड्यात!

Political News : राज्यातील वजनदार मंत्री, आमदार व राज्यसभा सदस्यांना लोकसभेवर पाठवण्याचा विचार.

Sachin Waghmare

Bjp News : आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक कुठल्या परिस्थितीत जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी सर्वच परीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील दिग्गज केंद्रीयमंत्र्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले जाणार आहे, तर दुसरीकडे राज्यात महायुतीकडून वजनदार मंत्री, आमदारांना लोकसभेत पाठविण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे या उमेदवारीवरून आता काही ठिकाणी राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील महायुती सरकारमधील घटकपक्ष असलेल्या भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतेमंडळींची लोकसभा निवडणुकीसाठी बैठक पार पडली. यामध्ये महायुतीच्या जागावाटपावर चर्चा झाली. यामध्ये जिंकून येण्याची क्षमता या निकषावरून जागावाटप करण्याचे ठरले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantivar) (चंद्रपूर), गिरीश महाजन (रावेर), विधानसभा सभापती राहुल नार्वेकर (दक्षिण मुंबई), विनोद तावडे (उत्तर मुंबई), रवींद्र चव्हाण (ठाणे), चंद्रशेखर बावनकुळे (वर्धा), आमदार जयकुमार रावल (धुळे), आमदार मंगेश चव्हाण (जळगाव) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या जागेवर छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, धाराशिवमधून तानाजी सावंत, यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उदय सामंत या मंत्र्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा विचार सुरू केला आहे.

येत्या काळात शिंदे गटाच्या काही खासदारांना भाजपचे कमळ हे चिन्ह हवे आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाला किती जागा द्यायच्या, याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. हे ठरवताना त्यांचे उमेदवार कोण असणार, हे ठरविण्यात येणार असून यामध्ये भाजपकडून हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार भाजपला असल्याची चर्चा जोरात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभा सदस्यांना मतदारसंघ शोधण्याची सूचना

भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची तिकिटे कापली जाणार आहेत. राज्यसभेचे सदस्य असलेल्या केंद्रीयमंत्र्यांना त्यांच्यासाठी मतदारसंघ शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले बडे नेते मैदानात उतरवले होते. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत ही रणनीती पुन्हा आखली आहे.

राज्यसभेचे सदस्य असलेल्या केंद्रीयमंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे, (Narayana Rane) पीयुष गोयल यांना महाराष्ट्रातून, तर धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णवी यांना ओडिशातून मनसुख मांडवी यांना गुजरातमधून, तर भूपेंद्र यादव हरियानातून, राजीव चंद्रशेखर यांना कर्नाटकमधून लोकसभेची निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना त्यासाठी पसंतीचा मतदारसंघ निवडायचा आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT