Nagpur News : मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी संजय कुटे यांचीही नाराजी समोर आली आहे. त्यांनी याबाबत उघडपणे भाष्य केले नसले तरी सूचक विधान केले आहे. राजकारणमध्ये कुटनीती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. पण माझ्या स्वभावात आणि संस्कारात कुटनीती कुठेही नाही, त्यामुळे कदाचित मी या प्रवाहात कुठेतरी बाजूला राहण्याचा प्रसंग माझ्यावर आला असल्याचे भाष्य कुटेंनी केले आहे.
संजय कुटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांना उद्देशून कुटेंनी सोशल मीडियात पोस्ट करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करतानाच्या आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहे. आपल्या लांबलचक पोस्टमध्ये त्यांनी मंत्री आकाश फुंडकर यांचेही अभिनंदन केले आहे.
माझ्या आई वडिलांनी माझ्यावर सुसंस्कृत संस्कार केले आहेत, माझ्या आईवडिलांनी मला शिकवले आहे, महत्वाकांक्षा जरूर ठेवावी पण ती राक्षसी नसावी. दुसऱ्यांचा जीव घेऊन किंवा कुटनीती करून किंवा दुसऱ्यांना संपवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या कर्तव्याने मेहनतीने सेवेने, चांगले आणि प्रामाणिक काम करून तुम्ही पुढे गेले पाहिजे, असे कुटेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
बालपणापासून माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संस्कार झालेले आहेत, लहानपणापासून पिंगळे सरांच्या शाखेत जाणारा मी एक स्वयंसेवक आहे. त्यागामध्ये मी कुठे कमी पडलो असे मला वाटत नाही. ज्या ज्या वेळी पक्षाने मला त्याग करायचा सांगितलं, तेव्हा मी चांगल्या मनाने त्याग सुद्धा केलेला आहे. आज सुद्धा पक्षाने मला थांबवले याचे मला जरासुधा दुःख नाही, असे कुटेंनी स्पष्ट केले आहे.
पक्षाने हा निर्णय का घेतला असेल हे मी सुद्धा समजू शकलेलो नाही, तसेही तो पक्षाचाच अधिकार आहे आणि आता समजून घेण्याची मला आवश्यकता सुद्धा वाटत नाही. शेवटी मला हेच वाटत आहेत की, मीच कुठेतरी यामध्ये कमी पडलो आहे. त्यामुळे कदाचित पक्षाने हा निर्णय घेतला आहे. परंतु माझा पक्षावर अजिबात रोष नाही. भाजपा हे आपले सर्वांचे घर आहे आणि घरापासून कधीच रुसायचे नसते. घरामध्ये कधीकधी मनाविरुद्ध निर्णय हे होत असतात आणि ते मोठ्या मानाने स्वीकारावे लागतात, अशी भावना कुटेंनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.