Mangalvedha Politics Sarkarnama
महाराष्ट्र

Mangalvedha Politics: विधानसभा निवडणुकीतील विरोधक पालिकेसाठी एकत्र:आमदार आवताडेंना आव्हान

Mangalvedha Mahanagarpalika election 2025: गेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या नगरपालिकेत आमदार समाधान आवताडे व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्वपक्षीय आघाडी करत एकत्र येत भाजपा समोर आव्हान उभे केले आहे.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. मंगळवेढा नगर परिषदेत सर्वपक्ष आघाडी स्थापन झाली असून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. राज्यस्तरावरून भारतीय जनता पार्टीला नगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या नगरपालिकेत आमदार समाधान आवताडे व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्वपक्षीय आघाडी करत एकत्र येत भाजपा समोर आव्हान उभे केले आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरांमध्ये भाजप नगरपालिकेवर भाजपाने कमळ फुलवण्यासाठी पक्ष बांधणी मजबूत केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये इतर पक्षांमध्ये समन्वय होत नसल्यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. बुधवारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या संपर्क कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत भाजपच्या विरोध सर्वांनी एकमताने लढण्यावर सहमती दर्शवली.

बैठकीला माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे बबनराव अवताडे भगीरथ भालके भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत शहराध्यक्ष काँग्रेस राहुल घुले तालुकाध्यक्ष प्रशांत साळे राज्य सचिव रविकिरण कोळेकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेशर अवताडे बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार राष्ट्रवादीचे मतदार संघ अध्यक्ष पांडुरंग जावळे, तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले, मुरलीधर दत्तू, सोमनाथ माळी, अशोक चेळेकर आधी उपस्थित होते.

भाजपाकडे 80 पेक्षा अधिक उमेदवारांनी निवडणुकीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली त्यामुळे शहरात भाजप मजबूत अवस्थेत आहेत, अशा परिस्थितीत भाजपाच्या विरोधात कोण आव्हान देणार अशी परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना हे पक्षामध्ये एकमत न झाल्यास निवडणूक भाजप एकतर्फी लढाया जिंकू शकते अशी परिस्थिती आहे.

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सध्या शहरांमध्ये सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या संदर्भात गेली चार दिवसापासून वारंवार बैठका घडत होत्या. परंतु त्याला अंतिम यश येत नव्हते. बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीवर यावर सगळ्यांनी तोडगा काढला आहे. तुर्त सर्वांनी अर्ज दाखल करावेत नंतर उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा झाली त्यानुसार भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी सध्या एक टप्पा या सर्व पक्षांनी पार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT