Rahul Narwekar Manikrao Kokate sarkarnama
महाराष्ट्र

Manikrao Kokate : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंची आमदारकी, मंत्रिपद धोक्यात? विधानसभा अध्यक्षांनी सांगितले कारवाई कधी करणार

Rahul Narwekar Hints Manikrao Kokate's MLA position in danger. : माणिकराव कोकाटे यांना शिक्षा होऊन देखील विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई होत नसल्याने काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

Roshan More

Rahul Narwekar News : सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली होती. मात्र, मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतरही विधासभा अध्यक्षांनी कारवाई केली नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई कधी करणार हे सांगितले आहे. शिक्षेच्या आदेशाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर अपात्रतेच्या संदर्भात कारवाई केली जाणार असल्याचे नार्वेकर म्हणाले आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.

माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत तसेच खोटी माहिती देत आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे मात्र त्यांना जामीन मंजुर झाला आहे. मात्र, लोकप्रतिनिधीला शिक्षा झाल्यानंतर ते आमदारपदी राहण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे कोकाटे हे सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.

काँग्रेस नेत्यांकडून टीका

तत्कालीन काँग्रेसचे आमदार सुनिल केदार यांना जिल्हा बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर दुसऱ्या दिवशीच विधिमंडळ सचिवालयाकडून सुनिल केदार यांना अपात्र ठरवत त्यांची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना काढली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा होऊन देखील विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई होत नसल्याने काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

सरकारच अडचण वाढणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर कृषी साहित्यातील खरेदीत 300 कोटींच्या भ्रष्टाराचाराचा आरोप करण्यात येत आहे. त्यामध्ये आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अपात्र ठरवण्याचे नियम काय?

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झाल्यास तो सदस्य त्या तारखेपासून अपात्र ठरतो, अशी तरतूद आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. सोमवारी कोकाटे हे उच्च न्यायालयात अपिल करणार आहेत. त्यामुळे न्यायालया त्यांचे शिक्षेला स्थगिती देणार की शिक्षा कायम ठेवणार यावर देखील त्यांचे भवितव्य ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT