Manoj Jarange Patil On Dhananjay Munde News sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : हत्येचा कट, मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंचे नाव घेतलं, काय प्लॅन होता सगळंच सांगितलं!

Manoj Jarange Patil Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट आरोप केला.

Roshan More

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचे आरोप करण्यात येत होते. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतल्याचे देखील सांगण्यात येत होते. दरम्यान, या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

जरांगे पाटील म्हणाले, बीडच्या मोठ्या नेत्याच्या पीए की कार्यकर्ते यांनी मिळून हत्येचा कट रचला. त्यामागे धनंजय मुंडे होते. त्यांनी भेट घेत कसा मारायचं याचा प्लॅन केला. गाडीने गाडी धडकून मारू, असा प्लॅन झाला. त्यासाठी परराज्यातील पासिंग असलेली गाडी देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी मराठ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. ते शांत राहिले आहेत. आरोपींना पकडा किंवा सोडा आम्हाला काही करायचं नाही. बीडचा एका मोठ्या नेत्याची पीए की कार्यकर्ता तो आरोपींकडे गेला. येथून घटनाक्रम सुरू झाला.

कांचन नावाचा माणून धनंजय मुंडेचा पीए आहे. तो आरोपींना धनंजय मुंडेकडे घेऊन गेला. महत्वाची बैठक सुरू होती ती सोडून धनंजय मुंडेंनी बाहेर आला. त्यांच्यापाशी आधी दुसरा एक आरोपी होता. कसं करायाची याची चर्चा झाली आणि दोन कोटीमध्ये त्याचं ठरलं. आणि 50 लाख एस्ट्रा देण्याचे ठरले म्हणजे अडीच कोटीमध्ये ठरले.

घातपात करणारे प्रत्यक्ष धनंजय मुंडे भेटले. काही जुळना म्हणून आरोपींची वाट पाहत संभाजीनरच्या एका फाट्यावर एक तास धनंजय मुंडे वाट पाहत होते. खरं खोट तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही सांगत आहे. हा कट रचनारा मुख्य सुत्रधारच धनंजय मुंडे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT