Manoj Jarange Patil sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार? आज होणार फैसला, मुंबईला निघण्यापूर्वीच...

Hunger Strike : मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईला रवाना होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी उपोषण सोडायची की उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघायचे याचा निर्णय आज घेणार आहेत.

Roshan More

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 16 वा दिवस आहे. ते उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे उपोषण सुरू ठेऊनच मुंबईकडे निघायचे की उपोषण सोडून निघायचे, यावर आज आंतरवाली सराटीमध्ये ते निर्णय घेणार आहेत.

मनोज जरांगे पाटलांनी या आधीच आवाहन केले आहे की, सरकारने आंतरवाली सराटीमध्ये येऊन चर्चा करावी, अथवा आम्ही मुंबईला निघाल्यानंतर त्यांना रस्त्यात चर्चा करायची असेल तर आम्ही रस्त्यात चर्चा करू.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा घेतला आहे. ते चार दिवसांचा प्रवास करून मुंबईत पोहोचून 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. सणासुदीचे दिवस असल्याने त्यांच्या आंदोलनाला विरोध करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये फूट?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईच्या घोषणानंतर नाशिकमधील मराठा आंदोलकांमध्ये फूट पडली आहे. एक गट तटस्थ राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपण मुंबईला जाणार नसल्याचे या गटाचे करण गायकर यांनी जाहीर केले. तर, चांदवड, चांदोरी, निफाड, नाशिक, देवळा यांसह विविध ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

'

'या' मार्गाने जाणार मुंबईला

मनोज जरांगे पाटील हे उद्या (ता.15) आंतरवाली सराटीमधून निघणार आहेत.

१५ सप्टेंबर - पहिला मुक्काम: पाटोदा (जि. बीड)

१६ सप्टेंबर -दुसरा मुक्काम: श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर)

१७ सप्टेंबर -तिसरा मुक्काम: हडपसर (जि. पुणे)

१८ सप्टेंबर - चौथा मुक्काम: खोपोली (जि. रायगड)

१९ सप्टेंबर - पाचवा दिवस: थेट आझाद मैदान, मुंबई (येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT