Manoj Jarange Hunger Strike  sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Hunger Strike : जात पडताळणी समित्याच बरखास्त करा, मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकले; उपोषण सुरू

Maratha-Kunbi Certificates Caste Verification Committees : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवालीसराटीमध्ये आपले आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्याआधीच त्यांनी जात पडताळणी समित्या रदद् करण्याची मागणी केली आहे,

Roshan More

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. या उपोषणाच्या आधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फक्त आपल्याच राज्यात जात पडताळणी समित्या आहेत. देशात इतरत्र कुठेच त्या नाहीत, त्यामुळे त्या बरखास्त करा, असे ते म्हणाले.

मराठा-कुणबी प्रमाणापत्र दिलेल्यानंतर जात पडताळणी समित्यांमध्ये ही प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांची प्रमाणपत्र प्रलंबित आहेत,ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी अंतरवालीमध्ये यावे, अशी हाक दिली होती. त्या प्रमाणात मोठ्या संख्येने लोक अंतरवालीमध्ये जमण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटील आपले उपोषण सुरू करणार आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, अधिकारी हे मराठ्यांचा द्वेष करतात. मला मराठा समाजाला सांगायचे आहे की तुमची मुलं अधिकारी बनवा त्यांना समाजाची दया येईल.

आम्ही तीन वर्षापासून आमच्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत. मात्र, ते वेळकाढूपणा काढत आहे. आम्ही तीन वर्ष वेळ दिला. पण यांच्या नियतीत खोट आहे. त्यामुळे अंमलबजावणीशिवाय माघार नाही, वेळ पडली तर मुंबईला जाऊ, असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला.

मनोज जरांगेंच्या मागण्या काय?

शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप, हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी, सातारा, कोल्हापूर संस्थाच्या गॅझेटिअरचा जीआर, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, मराठा समाजासाठी मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय, ज्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत त्यांना प्रमाणपत्रासोबत लगेचच व्हॅलीडिटी द्यावी आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT