मराठा आंदोलनाचे नेते, मनोज जरांगे-पाटील विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 288 ठिकाणी आमदार उभे करायचे की पाडायचे याचा निर्णय जरांगे-पाटील लवकरच घेणार आहेत. मात्र, जरांगे-पाटील यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, असं थेट आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे. पण, जरांगे-पाटील यांनी भुजबळांच्या आव्हानाची दखलच घेतली नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) आणि छगन भुजबळ आमने-सामने आले होते. दोघांमध्ये खालच्या स्तरावर जाऊन टीका-टिप्पणीही सुरू असते. मात्र, जरांगे-पाटलांनी विधानसभेला उमेदवार उतरण्याचं घोषित केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भुजबळांनी त्यांना राजकीय फडात उतरण्याचं आव्हान दिलं आहे.
छगन भुजबळांनी काय म्हटलं?
"मनोज जरांगे-पाटील यांनी रोज-रोज भूमिका बदलू नये. 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात, असे बोलताय. तुमच्यात हिंमत असेल, तर 288 उमेदवार उभे करा. तसेच, जरांगे-पाटलांनी स्वत: माझ्यासमोर उभे राहावे, हे आमचे आव्हान आहे. प्रत्येकवेळी बदलायचे कारण काय? आज उपोषणाला बसतात आणि दुसऱ्या दिवशी उठतात," असा निशाणा छगन भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) जरांगे-पाटलांवर साधला होता.
जरांगे-पाटलांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया...
यावर भुजबळांच्या आव्हानावर प्रश्न विचारल्यावर जरांगे-पाटलांनी फक्त चार शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "मी भुजबळांना मोजतच नाही," असं प्रत्युत्तर जरांगे-पाटलांनी भुजबळांना दिलं आहे. जरांगे-पाटलांच्या उत्तराला छगन भुजबळ काय उत्तर देतात? हे पाहावं लागणार आहे.
येवल्यातून कोणीही विरोधात लढावे...
"ओबीसी आरक्षण आणि त्यांचे संरक्षण करणे माझे काम आहे. मग ते सरकारमध्ये काय, रस्त्यावर काय, भुजबळला या 57 आणि 58 वर्षात सवयच आहे. येवल्यातून कुणीही लढावे. मी त्याच्याविरोधात एका लाख मतांनी निवडून येईन," असा विश्वास छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.