Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक आक्रमक करण्याची भूमिका घेतली आहे. सरकारकडून मागण्या मान्य न केल्यास मुंबईला धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्या प्रमाणे मुंबईला जाण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी मुंबईला जाण्यासाठी मीडिया व्हॅन तयार असल्याचे दिसते आहे.
जरांगे पाटील यांनी सरकारला 12 तारखेपर्यंत मुदत दिली होती. मात्र, सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मराठा आंदोलक मुंबईत धडकणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, उद्या शनिवारी (ता.12) अंतिम निर्णय होणार आहे. मराठा अभ्यासकांना आंतरवाली सराटीमध्ये येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये देखील प्रमाणपत्र रद्द होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत मराठा अभ्यासकांमध्ये एकमत दिसून येत नाही. मनोज जरांगे पाटील हे मराठा-कुणबीसाठी लढत आहेत मात्र, मुळ मराठे ज्यांच्या नोंदीच नाही त्यासाठी आवाज उठवत नसल्याचा आक्षेप घेत आहेत. मराठा अभ्यासक योगेश केदार यांनी जरांगे पाटलांनी ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही भूमिका घ्यावी असे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली तरी त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार आझाद मैदानावर फक्त सायंकाळीपर्यंत आंदोलन करता येणार आहे. त्यानंतर मैदान रिकामे करावे लागणार आहे. मागील आंदोलनाच्यावेळीच कोर्टाने याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे सरकार देखील मराठा आंदोलकांना मुंबई बाहेरच थांबवणार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.