Manoj Jarange Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange News : मनोज जरांगेंचा राजकीय अजेंडा ठरला असेल तर राबवावा ; अतुल भातखळकरांचा आरोप

Political News : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा मालिन करू नये, असे आवाहन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले आहे.

Sachin Waghmare

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा राजकीय अजेंडा ठरला असल्यामुळे त्यांनी तो राबवावा. या आंदोलनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप हे हास्यस्पद आहेत. त्यांचा या आरोपातून खरा हेतू कळाला आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे, त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा मालिन करू नये, असे आवाहन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले आहे.

अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पाडून दुही माजवण्याचा काम सरकारने केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना मला संपवायचे आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असे गंभीर आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भावनांचा उद्रेक झाला. (Manoj Jarange News)

त्यामुळे संतप्त झालेले मनोज जरांगे मुंबईकडे जाण्यासाठी निघाले आहेत. मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आता भाजप नेते पुढे आले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जरागेंनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील महायुतीने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. काही जण हे आरक्षण टिकणार नाही, असे सांगत आहेत. त्यांना संधी मिळाली, पण त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्या आहेत. त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे. त्यामुळे काळजी करू नये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करू नयेत, असे आवाहन अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केले आहेत.

SCROLL FOR NEXT