Manoj Jarange targets Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange: जरांगे आता थेट भिडणार? एकनाथ शिंदेंवर पुन्हा केले गंभीर आरोप; 500 कोटींच्या आरोपांचे पुरावे देणार

Manoj Jarange: दसरा मेळाव्यादरम्यान रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

Amit Ujagare

Manoj Jarange: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याची बाहेर चर्चा आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असा आरोप आणि मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बीडच्या नारायणगडावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात बोलताना केला. त्यांच्या या आरोपाला त्याच दिवशी रात्री शिवसेनेच्या मेळाव्यात सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देताना मनोज जरांगेंवरच आरोप केले. यानंतर आता पुन्हा एकदा जरांगेंनी थोरली बेगम असा उल्लेख करत कदम यांच्यावर निशाणा साधला तसंच ५०० कोटी रुपयांच्या चर्चेचा पुरावाच आता सादर करणार असल्याचं सूचकपणे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

जरांगे म्हणाले की, कालच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मी सांगितलेल्या गोष्टीवर भाष्य करण्यात आलं. रामदास कदम यांनी हे भाष्य केलं, पण याचा खुलासा खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच करायला हवा. आज संध्याकाळपर्यंत शिंदे याचा खुलासा करतील, अशी आशा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन ते जरांगेंपर्यंत पोहोचवले अशी बाहेर चर्चा सुरु आहे, असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसंच यावरुन माझ्याविरोधात मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी शिंदे यांच्यावर केला आहे.

पुरावे दिल्यानंतर शॉट होणार

एखाद्या शेतकऱ्यानं किंवा आंदोलकानं आंदोलनादरम्यान एखादी मागणी केलेली असते त्याचा राज्यकर्त्यांनी राग मानायचा नसतो. पण मी पुरावे दिल्यानंतर तुम्ही सर्वजण शॉट होणार आहात. आपण बोललो होतो पण उगाचच बोललो असं तुम्हाला वाटेल, यातूनच मग तुम्ही म्हणाल की याचा छडा लावू. पण तुम्ही यातून मराठा सामाजाला काय उत्तर देणार आहात? असा सवालही यावेळी जरांगे यांनी केला.

पत्रकार परिषदेत देणार पुरावे

पुराव्यांबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत ते मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवले अशी सध्या राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु आहे. कुजबूज हा पुरावाच आहे. शिंदे यावर आज काहीतरी बोलतील, एकतर पैसे दिले किंवा दिले नाहीत असं स्पष्ट करतील. एकनाथ शिंदेंनी स्वतः यावर काहीही बोलले नाहीत तर त्यांनी पैसे भाजपकडून घेतले असंच मी गृहित धरतो. त्यांनी मला पुरावे द्यायला सांगितले यावरुन हे देखील स्पष्ट होतं की, त्यांनी मला पैसे दिलेलेच नाहीत. पण आता उद्या (२२ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन याचे पुरावे मांडणार आहे, असं जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं.

एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप

जरांगे म्हणाले, "कुणबी प्रमाणपत्र द्यायचं यांनी रद्द केलं आहे, ते झाकण्यासाठी आता यांनी वेगळाच बोभाटा केला आहे. याला हाताला धर त्याला हाताला धऱ असा यांचा प्रकार सुरु आहे. सरकारनं केलेली चूक झाकण्यासाठी आता ते माझ्यावर आरोपांची राळ उठवत आहेत. ५०० कोटींचा विषय मला सांगणारा छोटी व्यक्ती नाही. मी देखील इतका लांब हात घातला आहे तर शिंदेंना हे कळायला हवं. माझी चौकशी करता पण मला काही माहिती नाही 'बडी बेगम', तुझ्या मालकानं सगळं सुरु केलं. तो इतका खाली गेला की आमच्यावर आरोप करायला, त्यानं काही समन्वयक, अभ्यासक लोक मागे लावलेत. ज्या माणसाकडून काहीच अपेक्षा नाहीत ते सर्वकाही करायला लागले आहेत," असा खळबजनक आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT