Ajit Pawar and Dhananjay Munde Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Politics : धनंजय मुंडेंच्या विरोधात 'राष्ट्रवादी'मधील मराठा आमदार एकवटले? अजितदादा घेणार मोठा निर्णय!

NCP Politics Beed guardian minister Dhananjay Munde Ajit Pawar : हे. मराठा चेहरा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या रुपाने मराठा- ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न केला जात होता.

Roshan More

NCP Politics : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. कराड यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीमधील मंत्री हसन मुश्रीफ, दत्तात्रेय भरणे यांनी धनंजय मुंडें याची पाठराखण केली आहे. मात्र, राष्ट्रवादीमधील मराठा आमदारांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवारांकडे मराठा आमदारांनी केल्याची चर्चा आहे.

मराठवाड्यातील आमदारांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी होत असल्याची चर्चा आहे. मुंडे यांच्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठा समाज हा राष्ट्रवादीपासून दूर जाण्याची भीती मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांना वाटत आहे.

मराठा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य मतदार राहिला आहे. मराठा चेहरा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या रुपाने मराठा- ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, भुजबळांना मंत्रिमंडळात अजितदादांनी स्थान दिले नाही.

मुंडेंच्या नावाला विरोध होत असताना देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे अजितदादा बीडचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंना न देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वपक्षीय नेते मुंडेंच्या विरोधात

धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस यांनी मोर्चाच उघडला आहे. ते मुंडेंना बीडचे पालकमंत्रिपद देऊ नका, अशी मागणी करत आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदिप क्षीरसागर यांनी देखील मंत्रिमंडळातून मुंडेंना वगळण्याची मागणी केली आहे. बीडमध्ये निघालेल्या मोर्चात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील सहभागी झाले होते त्यामुळे त्यांचा देखील मुंडेंच्या नावाला विरोध असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT