Manoj Jarange, Devendra Fadnavis, Prasad Lad Sarkarnama
महाराष्ट्र

Prasad Lad : फडणवीसांना खडसावणाऱ्या जरांगेंना प्रसाद लाडांचे मोठे चॅलेंज

Manoj Jarange Patil Maratha Reservation Devendra Fadnavis : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना त्यांना चर्चा करण्याचे आवाहनही केले आहे.  

Rajanand More

Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीचा आवाज बुलंद करून शिंदे-फडणवीस-अजितदादांच्या सरकारला बघून घेण्याची भाषा करणारे या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे दिवसागणिक करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका करतानाच जरांगे फडणवीसांवरही संधी मिळेल तेव्हा टोचून बोलत मोकळे होतात.

फडणवीसांवर बोलताना काहीवेळा थेट तर काहीवेळा आडून जोरदार हल्ले जरांगे चढवतात. त्यावर फडणवीसांनी आजवर फारसे बोलले नाहीत. मात्र, आता फडणवीसांवरील हल्ले परतवण्यासाठी त्यांचे विश्वासू आमदार प्रसाद लाड हे जरांगेंना चॅलेंज करत आहेत.  

मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय, असे सांगत लाडांनी जरांगे यांना चर्चेला बोलावलं आहे. यानिमित्ताने लाड यांनी फडणवीसांची बाजू घेऊन थेट जरांगेंना अंगावर घेतल्याने जरांगे आता लाडांना कसा 'प्रसाद' देणार, हे लवकरच कळेल.

प्रसाद लाड यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, 60 वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले. जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत?, हा संशोधनाचा विषय आहे, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला आहे.

जरांगे पाटील साहेब, तुम्हाला माहिती देणारे चुकीची माहिती देतात, असेही लाड यांनी म्हटले आहे. आम्ही तुमचं आवाहन स्वीकारायला तयार आहोत, परंतु तुम्ही चर्चेला तयार आहात का, अशा खडा सवाल लाड यांनी केला आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे, परंतु एका विशिष्ठ व्यक्तीला टार्गेट करणे चुकीचे आहे. समाजासाठी लढायचे असेल तर चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे लाड म्हणाले आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT