Manoj Jarange  Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: आता थांबायचं नाही? आरपारची शेवटची लढाई; जरांगेंची मुंबईकडे कूच, पहिला मुक्काम जुन्नरला

Manoj Jarange Patil addresses supporters during his Maratha reservation march: मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांनी गणपतीची आरती केली, देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

Mangesh Mahale

मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी आज सकाळी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांशी संवाद साधला. 'आता थांबायचे नाही,आता आरपारची शेवटची लढाई लढायची. यानंतर तक धरून लढाई जिंकू शकतो.शांत डोक्याने ही लढाई जिंकायची आहे. कितीही दिवस लागले तर हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा,' असा ठाम निर्धार जरांगे यांनी केला आहे.

समाजाची मान खाली होईल असे एकानीही वागायचे नाही. आपल्याला भडकावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आपण शांत डोक्याने जायचे. आता आरपारची शेवटची लढाई लढायची. यानंतर तक धरून लढाई जिंकू शकतो. अशी लढाई जगाच्या पाठिवर कधी झाली नसेल इतक्या शांत डोक्याने ही लढाई जिंकायची आहे. कितीही दिवस लागले तर हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा. शांततेत मुंबईकडे निघायचे, असे जरांगे यांनी सांगितले.

मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांनी गणपतीची आरती केली, देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 'हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच आडवले. मग हिंदूच्याविरोधात कोण? आम्ही काय दंगली करायला निघालोय का? मग आम्हाला का आडवता? तुम्ही हिंदूविरोधी काम का करायला लागलात? याचेही उत्तर हवे आहे, असे जंरांगे म्हणाले

'सणाच्या दिवशी सरकारला राज्यात अशांतता पसरवायची आहे. मुख्यमंत्र्यांकडून जाणूनबाजून आम्ही शांततेत येत असताना आम्हाला त्रास का दिला जातोय? तुम्ही यासाठी त्यांना बसवले आहे का?', असा सवाल त्यांनी मोदींना केला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहे. त्यांचा पहिला मुक्काम जुन्नरमध्ये होत आहे. हजारो मराठा बांधव जुन्नर शहरात दाखल होणार आहेत. जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहे.

शिवनेरी परिसरात गर्दी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतमालाचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. “हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस मुदतवाढ द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंगळवारी समितीची बैठक झाली. आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हैदराबादच्या गॅझेटचा अभ्यास करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कारण ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. जरांगे यांनीच केलेल्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतावाढ देण्यात आली आहे” असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT