Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेत काल भाजपाचे नगरसेवक महावीर ढक्का आणि स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्यात मोठा वाद झाला. या वादावादीचे रुपांतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात आणि खंजीर, लोखंडी राॅडने हल्याच्या प्रयत्नात झाले. या घटनेवर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत गुंड निवडून आल्यानंतर दुसरं काय होणार? असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधला.
आंबोली घाटात आंबोली गावठणवाडी येथील एका डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणी बाराशे फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजाराम कुडतरकर असे या तरुणाचे नाव असून सोमवारी रात्रीपासून हा डंपर आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या परिसरात उभा होता. रात्रभर डंपर एकाच ठिकाणी उभा असल्याचे आणि चालक राजाराम याचा कोणताही पत्ता लागत नसल्याने डंपर मालकाला संशय आला. त्यांनी याची खबर आंबोली पोलीसांना दिल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा शोध लावण्यात यश आले आहे. घटनेचा अधिक तपास आंबोली पोलीस करीत आहेत.
सोलापूर शहर गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका महिलेच्या सहभागाचाही तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त गोहर हसन आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोठेवाडी या गावांमध्ये जत्रा होती. यावेळी सायंकाळच्या सुमारास वादळीवारांसह पाऊसाला सुरूवात झाली. यावेळी भाविकांनी भिंतीचा आसरा घेतला होता. हीच भिंत कोसळून सहा भावीक ठार झालेत. तर तर दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नीट पेपर फुटी मध्ये नवनवीन माहिती समोर यायला सुरुवात झाली आहे, लातूरमध्ये संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी च्या नीट एक्झाम ची तयारी करण्यासाठी येत असतात, मात्र याच लातूर मध्ये मागच्या 2 वर्षांपूर्वी नीट पेपर फुटी प्रकरणी दोन शिक्षकांना सीबीआय ने ताब्यात घेत कारवाई केली होती, तर आता पुन्हा नीट पेपर फुटी मध्ये देखील लातूर मधील एका नामांकित क्लास चालकाचा समावेश असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.
TCS कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार आरोपी तौसीफ अत्तारला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून धार्मिक भावना दुखावणे आणि महिला लैंगिक अत्याचारासंबंधित गुन्ह्यात देण्यात त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
जागतिक संकंटाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आवाहन केले. यानंतर आता विरोधकांकडून मोदी यांच्यावर जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीक करत 'धूल चेहरे पे थी और मै आईना साफ करता था' देशातील जनतेने देशभक्ती दाखवायची आणि यांनी हात वरती करायचे अशा शब्दात तोफ डागली आहे. तसेच त्यांनी, आयपीएल सारखा इतका मोठा इव्हेंट सुरू असताना मोठ्या प्रमाणावर इंधनाचा खर्च सुरू आहे. मात्र तो का थांबवत नाही असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
विरारच्या शिरगाव गावाच्या ठिकाणी खदानी जवळ आरटीआय कार्यकर्तासह विरारच्या मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मंडळ अधिकाऱ्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. लाकडी दांड्याने मारहाण केल्याने या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आत्माराम पाटील असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत मंडळ अधिकारी आणि त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या चौकशीसह अटकेची मागणी केली. तर दुसरीकडे महापालिकेने मतीन पटेल यांनी ज्या घरात निदा खान हिला आश्रय दिला होता, ते घर अनाधिकृत असल्याचे सांगत त्यावर बुलडोझर चालवण्याची पूर्ण तयारी केली. या शिवाय त्याचे नगरसेवक पद कसे जाईल, यासाठीही रणनीती आखली. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी सध्या एमआयएमला घेरल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.. राष्ट्रवादी एकत्र असताना प्रफुल्ल पटेलांच नाव वगळण्याची कोणाची हिम्मत नव्हती असं त्यांनी म्हटलंय..तसेच हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय असल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी म्हंटलय.
कल्याणमध्ये पूजापाठ करण्याच्या बहाण्याने 78 वर्षांच्या भोंदूबाबाने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची आजी आणि वडीलांचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. याची भीती दाखवत घरातील बाधा दूर करावी लागेल त्यासाठी पूजा घालणे गरजेचे असल्याचे सांगून भोंदूबाबाने मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी उल्हासनगरमध्ये राहत असलेल्या भोंदूबाबा साहिद शेखविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...
नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन समोर आले आहे . नाशिक पोलिसांनी एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरुन नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नीटची प्रश्नपत्रिका सुरूवातीला नाशिकमधूनच फुटल्याचा दावा केला जात आहे. नाशिकमधूनच अन्य राज्यांमध्ये ही प्रश्नपत्रिका गेल्याचा दावाही केला जात असल्याने खळबळ उडाली आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या तरूणाला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आजच ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे सायंटिस्ट सखाराम सानप यांनी दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पुढील 3 दिवसात राज्यात उष्माघाताचा धोका वाढला आहे, उष्माघातामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महाराष्ट्र उन्हाने तापला आहे, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे गेले आहे
राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करून निवासी क्षेत्रात ऑक्टोबर2024 पूर्वी झालेल्या जमिनीच्या तुकड्यांना मान्यता दिली आहे. मात्र, त्यानंतर कोणताही जमिनीचा तुकडा अधिकृत ले-आऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही. महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील. त्यानंतरही असे तुकडे झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ उडाली आहे. जालना रोड परिसरात रात्रीच्या सुमारास एका हॉटेलसमोर आशिष आठवले याने गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशिष आठवलेला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. त्याच्याकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आला आहे. सदर प्रकरणात निदा खानचा देखील महत्वाचा सहभाग होता, असा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने 50 पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला. जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचं उघड झालं आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातला महान गावानजीक गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळलेत. महान इथल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळच्या टेकडीवर एका झाडाला दोन्ही मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत गावकऱ्यांना दिसले. आत्महत्या केलेले दोघेही जण मित्र असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतकांमध्ये किशोर मारुती बोडखे (वय 60, रा. वरुड गाव, जि. वाशिम) आणि, तर दुसरा मृतक किशोर बळीराम सोनटक्के (वय 40, रा. कानडी बाजार) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही तीन दिवसांपासून बेपत्ता होते. आत्महत्या की घातपात? या दिशेने पोलिस करत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणारे तिघे सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, आरोपींकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहे. या सराईत गुन्हेगारांकडून 11 लाख 19 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमालासह जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केली.
भुसावळमध्ये नगराध्यक्ष पदाचा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना सरकारने अपात्र ठरवली आहे. असे असताना देखील नगराध्यक्षपदाचा पदभार सोडण्यास गायत्री भंगाळे यांनी नकार दिला आहे. नगरविकास विभागाने अपात्र ठरवल्याप्रकरणी गायत्री भंगाळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत असून, त्यावर सुनावली प्रलंबित असल्याने नगराध्यक्ष पदाचा पदभार सोडण्यास गायत्री भंगाळे यांनी नकार दिला आहे.
केंद्र सरकारने मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयांबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील घोषणांमुळे देशातील नागरिक, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पवारांनी सांगितले.
पिंपळगाव जोगा ता.जुन्नर येथील धरणाचा कालवा पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीतच रात्री फुटला असून लाखो लिटर पाणी तर वाया गेलेच आहे.मात्र या कालवा फुटीच्या पाण्याने अंदाजे २५ एकर शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आसामच्या मुख्यमंत्रीपदाची आज हिमंत बिस्वा सरमा शपथ घेणार आहेत. दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.