Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाचा मृत्यू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे, यासह आज दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय बातम्या जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

बारामतीत पुन्हा विमान कोसळलं असल्याची माहिती समोर येत आहे. गोजुबावी गावच्या हद्दीत शिकाऊ विमान कोसळलं असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाचा मृत्यू

समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे मंगळवारी लखनौमध्ये निधन झाले.

PM Modi Convoy Cut : PM मोदींचे 'SPG'ला ताफा कमी करण्याचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या वाहनांच्या ताफ्याचा आकार कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या 'विशेष सुरक्षा गटाला' (SPG) आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोने-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्के, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशभरातील नागरिकांना पुढील वर्षभरासाठी सोनं खरेदी करू नये, असं आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनानंतर बुधवारी (ता.१३) केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सोने-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्के होते ते वाढवून आता १५ टक्के केले जाणार आहे. या वाढीव किमती आजपासूनच लागू होणार आहेत.

निदा खानला आश्रय देणाऱ्या MIM नगरसेवकाचं घर अखेर महापालिकेकडून जमीनदोस्त

TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून आज घरावर बुलडोझर कारवाई करत घर जमीनदोस्त करण्यात आलं आहे.

राज ठाकरे आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत.

निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर कारवाई

नाशिकच्या TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या घरात निदा खानला लपवलं होतं ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवत हि तोडाक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT