Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : मुंबईमधून महत्त्वाची अपडेट समोर, आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

Marathi Breaking Live Updates: शिवसेना कुणाची यावरील अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Mangesh Mahale

मुंबईमधून महत्त्वाची अपडेट समोर, आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

राज्याची राजधानी मुंबईमधून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागली आहे. हे इन्कम टॅक्सचं कार्यालय चर्चगेट स्टेशनजवळ आहेत. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशन दलाच्या जवनांकडून ही आग विझवण्याचे, ती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.

डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा: सचिन अहिर

सचिन अहिर यांनी शनिशिंगणापूर येथे शनी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि राज्यावरील साडेसाती संपून राज्याची प्रगती व्हावी, यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी नगर–मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत महत्वपूर्ण टिप्पणी केली. ते म्हणाले, डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा असा टोला लगावला.

NTA Meeting : एनटीएच्या कार्यप्रणालीत आणि परीक्षा प्रक्रियेत करणार मोठे बदल

शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत एनटीएच्या कार्यप्रणालीत आणि परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याच्या तयारीवर भर देण्यात आला. परीक्षेच्या पारदर्शकतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने, शिक्षण मंत्रालयाने एनटीएला सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीनुसार, एनटीएला सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स आणि पेपर सेटिंग यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये खासगी क्षेत्रातील तज्ञांची नियुक्ती करावी लागणार आहे. यामुळे परीक्षेची गोपनीयता आणि अखंडता सुनिश्चित करण्यात मदत होईल. अशी अपेक्षा आहे.

राज्य सरकारने तयार केलेल्या मीसिंग लिंकचा काही भाग कोसळला तर सोशल मीडियातच मला ठोकलं जात होतं : नितीन गडकरी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आम्ही २७ वर्षांपूर्वी तयार केला आहे, त्यावर एकही खड्डा नाही. आहे का एखादा खड्डा. आपण प्रवास करताय ना त्यावरून. त्याची बातमी होत नाही. पण, राज्य सरकारने तयार केलेल्या मिसिंग लिंकवर खड्डे पडले आणि काही भाग कोसळला होता, त्यावेळी सोशल मीडियातून मलाच ठोकून काढण्यात येत होतं. पण, क्वॉलिटी कंट्रोलसाठी सोशल मीडियाचा चांगला वापर होत आहे, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी; मी महाराष्ट्रातच राहणार : देवेंद्र फडणवीस

माझ्यावर सध्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रातच राहणार आहे. अनेक रिकामटेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात, असा खोचक टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

पेण शहरातील संभाजी महाराजांचा तो पुतळा अखेर हटवला

रायगड शहरातील पेण शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात ‘मॉडर्न आर्ट’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेला पुतळा बसविण्यात आला होता. त्याचे अनावरणही करण्यात आले होते. मात्र, संभाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या प्रतिमेला साजेसा नव्हता, अशी टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागली होती. त्यामुळे अखेर पेण नगरपालिका प्रशासनाने अखेर तो पुतळा हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळांमध्ये अन्न बनवणाऱ्या संस्थाना एफएफएसआय नोंदणी आवश्यक

राज्यातील शाळांमध्ये अन्न बनवणाऱ्या संस्थाना एफएफएसआय नोंदणी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या संस्था, बचत गट यांना नोंदणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. नोंदणी परवान्याची खात्री करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर असणार आहे. अन्न सुरक्षा मानके 2020 ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

"संघर्षाची ११० टक्के तयारी”;  जावळीत शिवेंद्रसिंह भोसलेंचा शशिकांत शिंदे गटाला थेट इशारा

Shivsendra Singh : जावळीच्या राजकारणात सोसायट्यांच्या ठरावांवरून सुरू असलेला संघर्ष आता थेट आमनेसामनेच्या इशाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदे गटाकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट इशारा दिला आहे.

उद्यापासून फाटा क्रमांक पाचला पाणी मिळेल! माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा रोष

सांगोला : सांगोला तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक पाचच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फाटा क्रमांक पाचला पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मंगळवार (१८ ऑगस्ट)पासून निश्चितपणे पाणी सोडण्यात येईल. मंगळवार किंवा जास्तीत जास्त बुधवारपर्यंत पाणी न आल्यास आपण आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करू, असा इशारा माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.

मुंबईत आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयात आग लागल्यची घटना सोमीर आली आहे. याची वर्दी मिळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी अग्नशमनचे जवांनांकडून युद्द पातळीवर काम सरत आहात.

गिरीश महाजनांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया

गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाजे म्हणाले, तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते आपल्याला मान्य करावे लागेल. त्यांनी सर्वसामान्य लोकांचा विचार करून काम करावं. आमचं त्यामध्ये हस्तक्षेप असल्याचं काही कारण नाही.

जरांगे पाटील संतापले; ‘आता शांत बसणार नाही’, सरकारला दिला अल्टिमेटम

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. संबंधित वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी मराठा समाजाच्या लेकींबाबत बोलणाऱ्यांना इशारा दिला. आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याने संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा; महाजन-गोगावले यांच्यावर जबाबदारी

नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची, तर रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

89% रेल्वे स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव; CAGच्या अहवालातून धक्कादायक वास्तव

CAGच्या तपासणीत देशातील 89 टक्के रेल्वे स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता आढळली. महाराष्ट्रातील सात स्थानकांचाही यात समावेश आहे. पिण्याचे पाणी, शौचालये, बाके, पंखे, वॉटर कूलर, दिव्यांग सुविधा आणि प्लॅटफॉर्मवरील छताचा अभाव असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

NDAमध्ये जाणार नाही; शरद पवारांनी भूमिका केली स्पष्ट, चर्चांना पूर्णविराम

शरद पवारांनी NDAमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण NDAच्या विरोधातच असल्याचे स्पष्ट केले. नरेंद्र मोदींसोबत खासदारांची भेट झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने NDAमध्ये जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

Beed Politics : गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिली; शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा दावा

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2004 ते 2014 या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिली होती, असे म्हटलं आहे. खासदार शेट्टी हे परळी येथे प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Ahilyanagar Crime : अवैध मावा, गुटखा विक्रेत्यांवर अहिल्यानगर पोलिसांचे सहा ठिकाणी छापे; 16 जणांवर 6 गुन्हे दाखल, लाखाचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नेवासा, सुपा व पारनेर पोलिस ठाण्यात सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत वेगवेगळ्या सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईत 16 आरोपीविरूध्द 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात आरोपींकडून 1 लाख 37 हजार 580 रुपयांचा मावा, पानमसाला व सुगंधीत तंबाखु असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Stock Market Big News : कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टी 24300 च्या खाली घसरला; गुंतवणूकदारांना 40 हजार कोटींचा फटका

शेअर बाजारातील घसरणीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. सोमवारी निफ्टी 23 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 24343वर, तर सेन्सेक्स 117 अंकांनी घसरून 77892वर खुला झाला. सुरुवातीच्या सत्रात बाजारावरील दबाव वाढल्यानं निफ्टी 24300 च्या खाली घसरला. या सुरुवातीच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. गेल्या आठवड्यात निफ्टी 0.8 टक्क्यांच्या घसरणीसह 24366 वर बंद झाला होता. मिडकॅप निर्देशांकात 0.2 टक्क्यांची वाढ झाली, तर स्मॉलकॅप निर्देशांकात 0.3 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

Ukraine Biggest Attack : 800 ड्रोन्सने रशिया हादरला! भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचा कारखाना उद्ध्वस्त

रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षे पूर्ण झाली असूनही अद्यापही युद्ध थांबण्याचे नाव नाही, उलट दोन्ही देशांचे हल्ले अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहेत. युक्रेनने रविवारी रशियाच्या विविध शहरांना लक्ष्य करत तब्बल 800 हून अधिक ड्रोन्सद्वारे हल्ला केला. हा युक्रेनने केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहेत. यानंतर रशियानेही युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, रशियाने डागलेल्या एका क्षेपणास्त्राचा भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या मालकीच्या युक्रेनमधील पोलाद कारखान्याला मोठा फटका बसला आहे.

Bihar Temple Stampede : अशोकधाम मंदिरात सकाळीच एक मोठी दुर्घटना; विजेची तार पडल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू

बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात सकाळीच एक मोठी दुर्घटना घडली. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण करण्यासाठी या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती. या गर्दीत अचानक विजेची तार पडल्याने उपस्थित भाविकांना वीजेचा जोरदार झटका बसला. शॉक लागण्याची घटना घडताच लोकांनी पळापळ करण्यास सुरुवात केली आणि मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटने सात भाविकांचा मृत्यू झाला आणि डझनहून अधिक जण जखमी झाले.

Yavatmal Ashram School News : माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या आश्रमशाळेची दुरावस्था, पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या आश्रमशाळेत विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला दरवाजे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील ‘स्वर्गीय चिंधुजी लक्ष्मणराव पुरके’ अनुदानीत आश्रमशाळेतील हे भीषण वास्तव असून आदिवासी विकास विभागाच्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दरम्यान, या संदर्भातील अहवाल आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

Nashik Crime News : कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर; व्यावसायिकाची तब्बल 35 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर आणि शासकीय कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळ्यासाठी रस्त्यांच्या कामाची तब्बल 300 कोटी रुपयांची बनावट टेंडर प्रक्रिया दाखवून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत मालेगाव येथील एका व्यावसायिकाची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati News : तीन महिन्यांत अमरावतीत 734 जणांना झालेल्या सर्पदंशात 7 जणांचा मृत्यू; 433 नागरिकांना विंचूचा डंक

अमरावती जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. मे अन् जुलै, या अवघ्या तीन महिन्यांत तब्बल 734 नागरिकांना सर्पदंश झाला असून, यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील इर्विन रुग्णालयात सर्वाधिक 357 सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र त्यापैकी सहा जणांना जीव गमवावा लागला. तर चुरणी उपजिल्हा रुग्णालयात 96 रुग्णांवर उपचार झाले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात 433 नागरिकांना विंचू चावल्याची देखील नोंद झाली असून, सुदैवाने विंचूदंशामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही.

शरद पवाराच्या राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाला भेटणार

NCP(SP) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे. आज सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाची भेट घेणार असून एसआयआर मोहिमेतील अनियमिततेबाबत चर्चा करणार आहेत. निवडणूक आयोगाने न ऐकल्यास कोर्टात जाण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहे. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेतय

SIR फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज सकाळी ११ वाजता SIR च्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. SIR प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात येणार आहे

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निवडणूक सहप्रभारी म्हणून जबाबदारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT