Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : जेष्ठ नेते शरद पवार 3 तारखेला पुणे जिल्ह्यात दुष्काळ दौरा करणार

Political Breaking Live Headlines Updates : उल्हासनगरमध्ये आज ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड, यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! गव्हासह 6 रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ

रब्बी हंगामापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गव्हासह 6 प्रमुख रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा मिळावा, यानुसार नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत.

इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायलचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी कौतुक केले आहे. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो. त्यांनी इस्रायलच्या नागरिकांसह 174 प्रवाशांचा जीव वाचवला. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होवो. ते खरे नायक आहेत, अशा शब्दांत बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी त्यांचे कौतुक केले.

नागपूर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी

नागपूर शहर काँग्रेसच्या नवीन कार्यकारणीतील नियुक्तीयांवरून पक्षांतर्गत धुसफूस समोर आली आहे. नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विलास भालेकर यांची नियुक्ती केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार केली आहे.

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी २ लाख २२ हजार १४९ मतदार नोंदणी

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी २ लाख २२ हजार १४९ मतदार नोंदणी झाली आहे. सर्वाधिक १ लाख १७ हजार १७३ मतदार नागपूर जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे.

अशोक पवारांना घेरण्यासाठी माऊली कटकेंची फिल्डिंग

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर तालुक्यात राजकीय घमासान सुरू झाले आहे. सध्या माजी आमदार अशोक पवार हे जिल्हा बँकेवर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असून, त्यांना घेरण्यासाठी आमदार माऊली कटके व समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांना रणांगणात उतरवून बार उडवून देण्याचे नियोजन पक्के झाले असतानाच पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांनीही रणांगणात उडी घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

जिल्हा बँकेसाठी अतुलबाबांचा अर्ज

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या वतीने भाजपचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतरही आपली अंतिम उमेदवारी अद्याप निश्चित नसल्याचं अतुलबाबांनी स्पष्ट केलं आहे.

जेष्ठ नेते शरद पवार 3 तारखेला पुणे जिल्ह्यात दुष्काळ दौरा करणार

जेष्ठ नेते शरद पवार ३ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यात दुष्काळ दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांना भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरमध्ये आज ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

उल्हासनगर महापालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांची निवड आज विशेष महासभेत पार पडणार आहे. सात जागांसाठी तब्बल ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ACB कडून मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

एसीबीने (ACB) मुंबई महापालिकेच्या गोवंडीतील एम-पूर्व विभागातील BMC च्या दोन अधिकाऱ्यांवर 3 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता गणेश हनमंतराव चांदोलकर आणि उपअभियंता अविनाश दत्तात्रय दुधभाते यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT