दिल्लीत पोलिसांनी सीजेपीच्या काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं... मात्र आंदोलकांना गाडीत बसवल्यानंतर त्यांनी अचानक पोलिसांच्या गाडीचा दरवाजा उघडून तिथून पळ काढलाय... या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली असून, राजधानीत सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे...
दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही. अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील घरावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
जंतर-मंतर येथे पोलिसांनी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार जॉन यांना अडवले. हे शहर सर्वांचे असून पोलिसांनी माझ्या घरी चौकशी केल्याचा विरोध त्यांनी केला.
अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी विमानात घुसून दीपकें आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही. आतापर्यंत २०० आंदोलकांना ताब्यात घेतले असून आता युट्युबर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया, पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
नागरिकांची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करू नयेत, याबाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र दिल्लीत अनेक मेट्रो स्थानके आणि रेल्वे गाड्या अनावश्यकपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे आता मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
वनरक्षक राहुल रामदास बहिरम (वय 30 रा. ढवळी विहीर, जेबापूर) यांनी दुष्काळग्रस्तांची मदत मिळण्यासाठी लागणारा दाखला देण्यासाठी पैशांची मागणी केली. प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये याप्रमाणे दीड हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष सचिन साळुंखे आणि पोलीस निरीक्षक पद्मावती कलर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सरकारने नवी दिल्लीमध्ये 163 कलम लागू केले आहे. त्यामुळे मोर्चे, आंदोलनाला बंदी घालण्यात आली आहे. जंतर मंतरवर जे आंदोलक पोहोचत आहे त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे. तर, इतर आंदोलकांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी CJP चे संस्थापक अभिजीत दीपके मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावरून ते दिल्लीकडे रवाना झाला. आज सीजेपीकडून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने जंतर मंतरवर जाण्यास बंदी घातली असून तब्बल 40 हजार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.