पावसाळा संपल्यांतर सागरी मासेमारी सुरू झाली आहे. मात्र, समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांना मुबलक मासे मिळत नसल्याचे दिसून येतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना सध्या बांगडा, सुरमई, पापलेट हे मासे मिळत असले तरी यामध्ये मोठी घट झाली आहे. यंदा 2025-26 मध्ये सिंधुदुर्गचे मत्स्योत्पादन 6 हजार 413 मेट्रिक टनने कमी होऊन 17 हजार 032 मेट्रिक टन झाले आहे. जे 2024-25 मध्ये 23 हजार 445 मेट्रिक टन एवढे होते. या घटलेल्या मस्य उत्पादनामुळे माशांचे दर वाढल्याचे चित्र आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मोठे विधान केले आहे. आंदोलन रोखण्यासाठी सरकारला तब्बल ४० हजार निमलष्करी जवान रस्त्यावर तैनात करावे लागले, यावरूनच सरकार आंदोलनाला किती घाबरले आहे आणि आंदोलन किती शक्तिशाली आहे, हे स्पष्ट होते, असा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला.
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य दिल्लीकरांना बसत आहे. तर पोलिसांनी विनाकारण प्रवास करणं टाळण्याचं आवागन केलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीकडून मुंबईतही आंदोलनाची हाक देण्यात आली असून आज दुपारी चार वाजता शिवाजी पार्कवर CJP कडून आंदोलन केलं जाणार आहे.
कॉक्रोज जनता पार्टीच्या कालच्या जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वीच CJP संस्थापक अभिजित दिपके यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील CJP आंदोलन करण्यावर ठाम असून आजच्या मोर्चाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे हे करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.