इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 6 मेट्रो स्टेशन सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, प्रवाशांसाठी इंटरचेंज सुविधा सुरू राहणार आहे. सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. कोणती स्टेशन बंद आहेत, ते पाहा.
बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी माळेगावात सुरू झाली आहे. 21 संचालक पदांसाठी 83 उमेदवार रिंगणात असून, निवडणुकीत 84.25 टक्के मतदान झाले. अजित पवार गटाची सत्ता कायम राहणार की सुनेत्रा पवार यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंडिया आघाडीच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे जवळपास 100 प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात होणाऱ्या या आंदोलनातून काँग्रेस शक्तिप्रदर्शन करणार आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी, पोलिस सर्वांना आंदोलनासाठी 10 दिवस आधी संपर्क साधण्यास सांगतात. आता आम्हीच त्यांना जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठीची तारीख आणि वेळ निश्चित करण्याचा पर्याय देत आहोत. यासाठी आम्ही पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे, असे सांगितले.
शक्तिपीठ महामार्गाची मोजणीचे काम सध्या सुरू असून, आज मोजणीचे अधिकारी माढा तालुक्यातील तुळशी गावात गेले असतात, तेथील बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थन देत अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध आता कमी होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई शिवाजी पार्क येथे मैदानातील विद्यार्थी आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांना रोखल्यावरून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे अमित ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे बंधू मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या सुटकेसाठी आडवे पडले होते.
हिंगोलीच्या फटाका अग्निकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आगीच्या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेत 16 नागरिक आगीत भाजले होते.
अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांच्या व्हिडिओवर मोठा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिस म्हणाले, तुम्हाला आई-वडिलांना फोन लावायचा आहे का? आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्यामुळे मी म्हटलो गावाकडच्या भावाला फोन लावू द्या. दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ मोडतोड करून दाखवला. दिल्ली पोलिस म्हणाले तुम्हाला मोबाईल नंबर पाठ आहे का? मोबाईल नंबर पाठ नसल्यामुळे मोबाईलची मागणी केली. मात्र मोबाईल उपलब्ध करून दिल नाही. वकिलांना बोलू द्या, म्हटलं ते पण करू दिलं नाही, असा दावा अभिजीत दिपके यांनी केला आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे आणि भविष्यातील पाणी टंचाईचं गांभीर्य लक्षात घेता, रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दर सोमवारी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नियमित पाणी पुरवठ्यात आगामी काळात 15 मिनिटांची कपात करण्याचा प्रस्ताव आहे. रत्नागिरी शहराला दररोज 20 एमएलडी पाणी लागते. शीळ धरणात 99.73 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रत्नागिरी शहरात 12 हजाराहून अधिक नळ कनेक्शन धारक आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यामुळे महिन्याला 80 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे.
'इंडिया आघाडी'चा दिल्लीत आज मोर्चा होत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत साडे अकरा वाजता तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेट नाकारली आहे. यावर राहुल गांधी पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागले आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाली असून 93 टेबलावरती ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.
दिल्लीतील बंगला साहिब गुरुद्वारात झालेल्या आंदोलनासंदर्भात आणि धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा कथित भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, पक्षाचे आमदार, कार्यकर्ते आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, त्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून काँग्रेसचे जवळपास 100 मोठे नेते दिल्लीत दाखल झालेय. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात काढण्यात येणाऱ्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते मोठ्या संख्येने दिल्ली दाखल झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी आणि इंडिया ब्लॉक नेत्यांना भेटण्यास नकार दिला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एसआयआर संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता, तो प्रस्ताव त्यांनी फेटाळला.
सूर्य कांत यांनी ईमेलद्वारे प्रतिसाद देत राहुल गांधींचा प्रस्ताव नाकारला. त्यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्षनेते ज्या मुद्द्यांवर चर्चा करू इच्छित आहेत, ते मुद्दे आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला असून, पुरंदर तालुक्यातील आडाचिवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतींच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची या अभियानांतर्गत दखल घेण्यात आली.
MPSC आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी रविवारी (११ ऑक्टोबर) रात्री राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आंदोलनस्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगितले. त्यानंतर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपण रजेवर जात असल्याचे जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.