निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभर विरोधकांनी रान पेटविले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोगा विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धुळे शहरात कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन नागरिकांत 'एसआयआर' प्रक्रियेविरोधात संदेश देण्याचे काम सुरू केले आहे. मनसेचे शहर प्रमुख संजय सोनवणे यांनी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या सूचनेनुसार सबंध शहरभर हा संदेश देण्याचा संकल्प केला आहे. मनसेचे सर्वच पदाधिकारी त्यात सहभागी झाले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुण्यात आले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला; पण पक्षाच्या १२६ नगरसेवकांपैकी शंभरहून अधिक जणांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे पहिला मिळाले. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्याच कार्यक्रमाला नगरसेवकांनी दांडी मारल्याची बाब आता त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या शंभर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे काम पाहणार आहेत. मात्र, तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिवपदाची जबाबदारी सोपल्यानंतर ते आता एफडीए आयुक्तपदी राहणार की त्यांची बदली झाली? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. याच पार्श्वभूमीवर खुद्द तुकाराम मुंढे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत "माझी एफडीएमधून बदली झालेली नाही, मी एफडीएचा आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे." असं स्पष्ट केलं आहे.
विधान परिषदेच्या पुणे शिक्षक व पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील २५ विधानसभा मतदारसंघासाठी खास प्रभारी नियुक्त केले आहेत. यामध्ये पक्षाचे आमदार, माजी खासदार-आमदार यांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठराव धारकांना सहलीवर पाठवण्यात आलं असून इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ठराव धारकांना सहलीवर पाठवण्यात आलं आहे. क्रॉस वोटिंगचा फटका बसू नये यासाठी महायुतीने ठराव धारकांना सहलीवर पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.