Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘नेट’साठी 28 पर्यंत मुदत

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, विधान परिषद आणि जिल्हा बँक निवडणुका आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासह राज्य आणि देशभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर.....

सरकारनामा ब्युरो

आमदार नायकवडी यांना धमकी

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "समान नागरी कायद्याला विरोध केलात तर तुम्हाला खलास करू," असे या पत्रात म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘सेंट्रल किचन’द्वारे पुरविण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता तपासणीसाठी चौकशी समिती स्थापन

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘सेंट्रल किचन’द्वारे पुरविण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता व कामकाजाच्या तपासणीसाठी शासनाने नऊ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला 30 ऑक्टोबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे

Nashik News : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘नेट’साठी 28 पर्यंत मुदत

‘नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी’तर्फे (एनटीए) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘यूजीसी-नेट डिसेंबर 2026 परीक्षे’साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेचे आयोजन येत्‍या 14 ते 19 डिसेंबरदरम्‍यान राष्ट्रीय पातळीवर केले जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 28 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल. नियमित शुल्‍क भरण्यासाठीदेखील हीच मुदत लागू राहणार आहे. विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत 29 ते 31 ऑक्‍टोबर अशी असेल.

Thane Crime : नवी मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1.15 कोटी रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त

नवी मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका ट्रकमधून 1.15 कोटी रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले असून, ट्रकचालकाला अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. भरारी पथकाने ट्रक अडवून तपासणी केली. या ट्रकमध्ये शुल्क न भरता वाहतूक केले जात असलेले मद्य आढळले. हे मद्य केवळ गोव्यात विक्रीसाठी तयार केले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितले.

Nagpur : ‘कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 46वे राज्यस्तरीय अधिवेशन 19 ऑक्टोबरला नागपूरला होणार

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 46वे राज्यस्तरीय अधिवेशन 19 ऑक्टोबरला नागपूर येथे आयोजित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‍घाटन होणार असून, शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित राहतील. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा इंगळेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात पदोन्नतीतील आरक्षण, अनुशेष, जुनी पेन्शन योजना आदी प्रलंबित मागण्यांवर अधिवेशनात भर दिला जाईल. यावेळी महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात येतील.

India And America : भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत; अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनिमित्त कार्यक्रम

भारत आणि अमेरिका संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवत असून, दोन्ही देशांतील गुंतवणूक आणि संयुक्त उपक्रमांमुळे मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जोधपूर येथे झालेल्या ‘तरंग शक्ती’ लष्करी सरावाचा उल्लेख करत त्यांनी संरक्षण सहकार्य अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या आठवड्यात चर्चा झाल्याचेही गोर यांनी नमूद केले.

Bihar Update : बिहारमध्ये दुर्गापूजेच्या मंडपांना आग; समाजकंटकांनी आग लावल्याचा आरोप

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दुर्गापूजेच्या दोन मंडपांना आग लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. भुलाहीपूर परिसरात ही घटना घडली. काही समाजकंटकांनी आग लावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असून आयोजकांकडूनही माहिती घेतली जात आहे. प्राथमिक तपासात धार्मिक तेढ नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

India And America : भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत; अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनिमित्त कार्यक्रम

भारत आणि अमेरिका संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवत असून, दोन्ही देशांतील गुंतवणूक आणि संयुक्त उपक्रमांमुळे मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जोधपूर येथे झालेल्या ‘तरंग शक्ती’ लष्करी सरावाचा उल्लेख करत त्यांनी संरक्षण सहकार्य अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या आठवड्यात चर्चा झाल्याचेही गोर यांनी नमूद केले.

Uttar Pradesh : राजकीय पक्षांकडून निवडणुकीची उमेदवारी विकली जात; सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली

उत्तर प्रदेशातील काही मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांकडून निवडणुकीची उमेदवारी विकली जात असल्याच्या आरोपांशी संबंधित स्टिंग ऑपरेशनची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्या स्वराज वाहिनी असोसिएशनला या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असलेले निवेदन व स्मरणपत्र पुन्हा सादर करण्याची मुभा दिली. आयोग तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला.

Himachal Pradesh Election : निवडणुकीसाठी आपची तयारी; भाजप आणि काँग्रेसला पर्याय देणार

हिमाचल प्रदेशात 2027मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) तयारी सुरू केली असून, भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्याचे उद्दिष्ट असल्याचे पक्षाचे राज्य प्रभारी ऋतुराज झा यांनी सांगितले. सिमल्यातील पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल 15 नोव्हेंबरच्या दरम्यान सिमल्याला भेट देणार असून, त्यावेळी सात ते आठ नेते पक्षात प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले.

Delhi News : रेल्वेच्या मालवाहतुकीत 6.14 टक्के वाढ; मालवाहतुकीतून मिळणारा महसूलही 9.3 टक्क्यांनी वाढला

रेल्वेच्या मालवाहतुकीत सप्टेंबरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 6.14 टक्के वाढ झाली. या महिन्यात 13.535 कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली. सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रमाण 12.752 दशलक्ष टन होते. अन्नधान्य वाहतुकीत 25 टक्के, कोळशात नऊ टक्के आणि पोलाद वाहतुकीत 5.5 टक्के वाढ नोंदवली गेली. मालवाहतुकीतून मिळणारा महसूलही 9.3 टक्क्यांनी वाढला.

Navaratri Festival : हिंदू नसलेल्यांना गरब्यात ‘नो एंट्री’; सनातन सुरक्षा दल हिंदुत्ववादी संघटनेच्या फलकांनी वाद

नवरात्रीनिमित्त जयपूरमधील विविध गरबा मंडपांबाहेर हिंदू नसलेल्यांना प्रवेश बंद असल्याचे फलक सनातन सुरक्षा दल या हिंदुत्ववादी संघटनेने लावले आहेत. उत्सवावर लक्ष ठेवण्यासाठी 27 पथके तैनात केल्याचे संघटनेचे संस्थापक रवी गौतम यांनी सांगितले. गरबा आयोजकांनी सहभागींची ओळखपत्रे तपासावीत, तसेच त्यांच्या कपाळावर टिळा लावून मनगटावर कलावा (धागा) बांधण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT