Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुनावणी, ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका

Political Breaking Live Headlines Updates : इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुनावणी, शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक यासह राज्य आणि देशभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर.....

सरकारनामा ब्यूरो

कुंभमेळ्याचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरा, रवींद्र तुपकर यांची मागणी

राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा चार-पाच वर्ष पुढे ढकलावा. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी असलेला 35 हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने राज्यातील दुष्काळ निवारणासाठी वापरावा, शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

अंकिता भंडारीचे पालकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

उत्तराखंडमधल्या हत्या झालेल्या अंकिता भंडारीच्या पालकांनी इंडिया गेटपुढे आंदोलन केलं. आज पहाटे भंडारी दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि दीड तासाने त्यांची सुटका केली. अंकिता हत्या प्रकरणातील व्हीआयपी आरोपीला राज्यपालपद दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलेलं. तर या घटनेनंतर हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत लज्जास्पद आहे असं ट्विट अभिजीत दिपकेंनी केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सहा नोव्हेंबरपासून संपावर जाऊ असे त्यांनी म्हटले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस

अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या एका निदर्शनात इम्रान खान सहभागी झाला होता.

‘संदीप उद्योग समूहा’वर आयकरचे छापे

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसाय, अहिल्यानगरमधील माजी महापौर संदीप कोतकर आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्याशी संबंधित ‘संदीप उद्योग समूहा’वर आयकर विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातून चारा वाहतुकीस बंदी

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व ओला चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चारा प्रकारांची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुनावणी, ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रिये विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीतील नेत्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT