Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : अंबड औद्योगिक वसाहतीतील रसायने मिसळलेल्या पाणीप्रश्नी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या अग्रिम मदतीवरून वाद, विधान परिषद,जिल्हा बँक निवडणुका आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर.....

Pradeep Pendhare

Nagpur News : सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-बल्लारशाह एक्स्प्रेस रद्द 

नागपूर कसारा यार्डच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. या कामामुळे 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून एका गाडीच्या मार्गात बदल केला आहे. या कामामुळे 17 ऑक्टोबर रोजी सुटणारी सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-बल्लारशाह एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Nashik News : अंबड औद्योगिक वसाहतीतील रसायने मिसळलेल्या पाणीप्रश्नी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल

अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील बोअरमध्ये विषारी रसायने मिसळलेले पाणी आढळल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी व भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण रोखावे, या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे.

Mumbai ABVP : राज्यघटनेतील मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अभाविपची मुंबई विद्यापीठात स्वाक्षरी अभियान

देशातील लोकशाही व्यवस्था, राज्यघटनेतील मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अभाविपच्या वतीने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वाक्षरी अभियान आणि शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. ‘अराजकता रोखा-लोकशाही वाचवा!’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

Nashik News : शालार्थ आयडी गैरव्यवहार; अमोल कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी अमोल कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

Mumbai News : नवी दिल्ली येथे झालेल्या 20व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा सात पुरस्कारांनी सन्मान

नवी दिल्ली येथे झालेल्या 20व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा सात पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, हरित ऊर्जेला प्राधान्य आणि धोरणात्मक बदलांमुळे महावितरणला देशातील ‘भविष्यवेधी डिस्कॉम’ या मुख्य श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

Mumbai Doctor : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून दोन दिवसांत 527 हून अधिक डॉक्टरांची नोंदणी

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दोन दिवसांत 527 हून अधिक डॉक्टरांची नोंदणी केली आहे. यामध्ये 330 तात्पुरत्या आणि 197 कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय कदम यांनी दिली.

Nagpur News Update : दिवाळीच्या तोंडावर नागपूर-मुंबई विमानप्रवास महागला

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-नागपूर मार्गाचे विमान तिकीट दर 22 हजार 800 रुपयांवर पोहोचल्याची माहिती आहे. प्रमुख शहरांमधून नागपूरकडे येणाऱ्या विमान तिकिटांचे दर 12 ते 22 हजार रुपयांपर्यंत कडाडले आहे. एरवी मुंबई, पुणे, बंगळुर, हैदराबाद आणि दिल्ली येथून नागपूरला येण्यासाठी सहा ते आठ हजार रुपये तिकीट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT