गोकुळ निवडणुकीतील मतमोजणीमध्ये क्रॉस वोटिंगचा धुमाकुळ
पहिल्या पंचवीस मतपत्रिकांपैकी नऊ मतपत्रिकांमध्ये पॅनल टू पॅनल मतदान
राधानगरी तालुक्यात 16 मतपत्रिकांमध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात
राधानगरी तालुक्यात सर्वाधिक क्रॉस वोटिंग
शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘माझी शाळा माझी जबाबदारी’ ही विशेष मोहीम जाहीर केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कामाचा व्याप आणखी वाढणार असून, विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी आणि अतिरिक्त कामे करायची कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुंभमेळा पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाच्या तयारीची बैठक त्रंबकेश्वर येथे झाली. यावेळी शहरातील सद्यस्थिती व विकास कामांमुळे झालेल्या अडचणी याचा आढावा घेण्यात आला. यावेळी शाही स्थानाच्या मिरवणुकीसाठी पर्याय मार्गाला मान्यता देण्यात तयारी दर्शविण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती आणि महंत दुर्गादास यांनी स्थानिक नागरिकांची सोय विचारात घेतली जाईल. स्थानिकांना त्रास होत असल्यास कुंभमेळा शाही स्नानाचा पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली.
गोकुळसाठी मतमोजणीला सुरवात झाली आहे. करवीर, भुदरगड, गगनबावडामध्ये क्रॉस व्होटींग मोठ्या प्रमाणात. नऊ नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होणार आहे.
अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यावर मुंबईत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. राज्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही अशी स्थिती आहे. सुदैवाने या घटनेत अभिनेत्यास इजा झालेली नसली तरी काही व्यक्तींना दुखापत झाल्याचे समजते. भरदिवसा, भररस्त्यात गुन्हेगार कोयते नाचवित आहेत, गोळीबार करीत आहेत. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचे हे चित्र अतिशय चिंताजनक आहे. यामुळे नागरीक धास्तावले असून आपल्या सुरक्षेबाबत साशंक आहेत. माझी गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की , कृपया आपण तातडीने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेऊन जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे खासदार सुप्रीय सुळे यांनी म्हटले आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची आज सकाळी आठ वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरवात झाली आहे. रमणमळा परिसरात मतमोजणी होत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्ट्राँग रूम ओपन करण्यात आला आहे. काल झालेल्या मतदान प्रक्रियेत 5418 पैकी 5416 ठरावधारकांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, निकालानंतर मिरवणूक काढण्यास बंदी असून निकालासाठी मतमोजणी परिसरात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.