शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्प्यात आला आहे. याच प्रचारादरम्यान माढ्याचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या काही आमदारांचे भर सभेत कान टोचले. लोकांनी शरद पवारांकडे पाहून मतदान केले आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या दारात जाऊन लाचारी पत्करू नका, अशा शब्दात आपल्याच आमदारांचे कान टोचले आहेत.
शिर्डीत साईबाबांच्या 108 वी पुण्यतिथी आणि दसऱ्याचा मोठा उत्साह असून उत्सवानिमित्त साई संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज साईमंदिर भक्तांना दर्शनासाठी राहणार रात्रभर खुले राहणार आहे. साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले असून साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमली आहे. काही वेळातच शिर्डीत भिक्षा झोळीचा कार्यक्रमात साई संस्थानचे अधिकारी, साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थं या सोहळ्यात सहभागी होतात. उत्सवानिमित्त साईं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून धनदांडग्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. दोन्ही बाजूकडील उमेदवारांना बेरोजगार पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्यांची जाण नाही. भाजपचे शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. त्यामुळे OBC आणि VJNT बेरोजगार तरुणांनी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
खासगी बँका आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातील दोन दिवसांची तेजी आज थांबली. सेन्सेक्स 876.37 अंशांनी, तर निफ्टी 257.20 अंशांनी घसरला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्यापेक्षा अधिक घट झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगरातर्फे विजयादशमी उत्सवाचे आयोजन आज सकाळी रेशीमबाग मैदानावर करण्यात आले आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त आयोजित या उत्सवाला ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच पश्चिम-मध्य भारतातील इस्राईलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच हे निमंत्रित अतिथी आहेत.
शिवसेनेच्या सहा दशकांच्या राजकीय परंपरेचा वारसा सांगणारा दसरा मेळावा मंगळवारी (ता. 20) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार आहे. सायंकाळी पाचला होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या स्थापनेला यंदा 60 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.