ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पोलिसा वागळे इस्टेटमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वागळे इस्टेट परिसरातील बार अँड रेस्टॉरंटमध्ये सापळा लावून हिंदी वेबसिरीज आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीला अटक केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात संजय राऊत यांनी अन्न व सुरक्षा भेसळ याबाबतच्या कारवाईबाबत अभिनंदन करत FDA अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीबाबत तात्काळ कारवाईच्या मागणी केली आहे.
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यार्थी परिषदांची स्थापना आणि निवडणुकांची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १२ सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, महिनाभरात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज भरावेत. मात्र, पक्षाने आदेश दिल्यानंतर मागे घ्यावेत, ज्यांना तिकडून उभारायचे आहे त्यांनी इकडच्या पद, सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्याचे समजते. शिवाय भाजप आणि महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला समोर जातील असेही पाटील यांनी जाहीर केले.
देशभरातील बँकांचे कर्मचारी आज 28 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप मागे घेण्यात आला आहे.
भाजपचे अहिल्यानगरमधील नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांची सोशल मीडियावर राजकीय कट रचून बदनामी केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हरिभाऊ गाडेकर, भाऊसाहेब ऊर्फ मुन्ना सदाफळ, कैलास विठ्ठल सदाफळ, संजय रामचंद्र सदाफळ, विजय डी. सदाफळ व प्रवीण रमणलाल रुणवाल यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊन एक दिवस उलटत नाही तोच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या 65 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर येथे रविवारी समोर आली. देविदास लक्ष्मण सोळंके असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आर्थिक संकट, दुबार पेरणीचा खर्च आणि पावसाअभावी हातचे गेलेले पीक यामुळे ते विवंचनेत होते.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदय बंद पडल्यामुळे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रिया गणेश मावस्कर (वय 11, रा. राणीगाव, ता. धारणी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शवविच्छेदनास पालकांनी नकार दिला. आदिवासी विभागाकडून पालकांना सानुग्रह अनुदान देण्यात आले.
घाटकोपर-वर्सोवादरम्यान मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने व्यवस्थापन आणि माहिती सुरक्षेच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत एकाच वेळी चार प्रतिष्ठित आयएसओ प्रमाणपत्रे मिळवली आहेत. या कामगिरीसह मुंबई मेट्रो वन ही इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम (आयएमएस) आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएसएमएस)चे एकात्मिक प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो ठरली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गोरखगड परिसरात रस्ता चुकलेल्या तिघांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. ट्रेकिंगसाठी आलेले तिघे परतीच्या मार्गावरील रस्ता चुकल्याने जंगलात भरकटले होते. यात एक तरुण आणि दोन तरुणींचा समावेश होता. अंधार पडल्याने त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मुसळगाव येथे 300 एमव्हीए क्षमतेचे नवीन वीज पारेषण उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्राचे भूमिपूजन शनिवारी झाल्याने त्याच्या उभारणीला वेग येणार असून, येथील उद्योगांना पुरेशा दाबाने मुबलक वीज उपलब्ध होणार आहे. मुसळगाव येथे टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग अंतर्गत 220/132/33 के.व्ही. क्षमतेचे हे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे.
गंगोत्री-गोमुख ट्रेकदरम्यान पाय घसरल्याने कर्जत येथील व्यापारी खोल दरीत पडल्याची दुर्घटना घडली. रामकुमार हनुमान गुप्ता (वय 65) असे व्यापाऱ्याचे नाव असून, प्रतिकूल हवामान आणि हिमवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि स्थानिक यंत्रणांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान पुढे आले आहे. संस्थानच्यावतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीस एक कोटी 11 लाख रुपयांचा भरीव सहयोग निधी सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.