धुळे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. पावसाने ओढ दिल्याने विहिरी आटू लागल्या आहेत, तर जगवलेली पिकं वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने पीक करपू लागली आहेत. एकीकडे पाऊस पडला नसल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे आणि दुसरीकडे वीजपुरवठाही सुरळीत होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वीज वितरण कंपनीकडून आश्वासन मिळूनही पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे, अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीत प्रति एकर 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे,
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाने आता केवळ शेतीच नव्हे, तर गावाचा वैवाहिक समतोलही बिघडवला आहे. माढा तालुक्यातील तुळशी गावात पाणी नाही म्हणून शेकडो युवकांची लग्नं रखडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंभर एकरचा मालक असूनही मुलगी मिळत नसल्याची हतबल कहाणी एका युवकाने मांडली आहे.
बीडमध्ये साखर कारखान्यांची धुराडी पेटली असतानाच ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनांनी संप पुकारला. तीन वर्षांचा करार संपल्याने साखर आयुक्तांना संपाचे पत्र देण्यात आले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील कायदेशीर लढाई सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 8 ऑक्टोबरची तारीख निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री मनोरमानगर परिसरात ही घटना घडली. पुर्णेकर हे कार्यालयात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.