Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : दोन वर्षांत पहिले स्वदेशी प्रवासी विमान आकाशात झेपावेल; नागरी उड्डाण मंत्री के.राममोहन नायडू यांचा विश्वास

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, विधान परिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका, एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्लीत काँग्रेस राहुल गांधी आणि विरोधकांच्या आंदोलनासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्युरो

Delhi BIG News : दोन वर्षांत पहिले स्वदेशी प्रवासी विमान आकाशात झेपावेल; नागरी उड्डाण मंत्री के.राममोहन नायडू यांचा विश्वास

संयुक्त उपक्रमातून येत्या दोन वर्षांत पहिले स्वदेशी प्रवासी विमान आकाशात झेपावेल, असा विश्वास नागरी उड्डाण मंत्री के.राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. देशाची नागरी उड्डाण क्षमता अधोरेखित करताना त्यांनी सांगितले, की विमान कंपन्यांना 100 अब्ज डॉलरची 1600 पेक्षा अधिक विमाने बनविण्याची ऑर्डर मिळाली असून येत्या दहा वर्षांत देशात 100 पेक्षा अधिक नवीन विमानतळ उभारले जातील.

Delhi News : महिला पत्रकाराच्या लैंगिक छळ; साहाय्यक पोलिस आयुक्त विवेक भगत यांचा अतिरिक्त पदाचा कार्यभार रोखला

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकाराच्या लैंगिक छळाचा आरोप असलेले साहाय्यक पोलिस आयुक्त विवेक भगत यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त पोलिस उपायुक्तपदाचा कार्यभार रोखण्यात आला आहे. भगत यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत हा कार्यभार न स्वीकारण्याची स्वतःहून विनंती केली होती. त्यानुसार दिल्ली सरकारने आधीचा आदेश बदलण्याचा निर्णय घेतला. भगत यांच्यावरील आरोपांची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

BJP Politics : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन नवीन बिहार दौऱ्यावर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे मंगळवारी बिहारची राजधानी पाटण्यात आगमन झाले. राज्यात 23 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राज्यातील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. विधान परिषदेच्या आठ जागांपैकी भाजप चार तर मित्रपक्ष असलेला संयुक्त जनता दल चार जागा लढवीत आहे.

Chhattisgarh News : नक्षलवाद्यांची एके 47 रायफल, इन्सस रायफल, बॉम्ब जप्त

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लपविलेल्या साठ्यातून सुरक्षा दलांनी मंगळवारी शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कोहकाबेडा आणि बरडम गावांच्या दरम्यान असलेल्या पर्वतमय प्रदेशात शोधमोहिम राबवीत असताना सुरक्षा दलांनी हा शस्त्रसाठा जप्त केला. या परिसरात नक्षलवाद्यांच्या साठ्याबद्दल सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात एके 47 रायफल, इन्सस रायफल, बॉम्ब, नक्षलवाद्यांचे गणवेश, वॉकी टॉकी आदींचा समावेश आहे.

Kolhapur News : ‘शक्तिपीठ’च्या जमिनी भांडवलदारांसाठी; किसान सभा राज्य राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन यांचा गंभीर आरोप

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी घेतल्या जात आहेत. अन्यत्र 60 मीटर रुंदीचे रस्ते असून, ‘शक्तिपीठ’साठी मात्र, 100 मीटर रुंदीचा मार्ग केला जात आहे. याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त जमीन ताब्यात मिळावी व ती भांडवलदारांच्या ताब्यात द्यावी, असे सरकारचे धोरण दिसत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी आज येथे केला.

Mumbai News : संघर्षानंतर आदिवासी विद्यार्थ्यांची नाशिकला रवानगी; आंदोलनाला भाजप सरकार घाबरल्याची काँग्रेसची टीका

भाजप सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारून अन्याय केला आहे. त्यातच भाजप सरकार व पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप काँग्रेसने केली आहे. विविध मागण्यांसाठी गेल्या 48 दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची काल सांगता झाली. नाशिकहून हे विद्यार्थी राजभवनाला धडक देण्यासाठी पायी मुंबईत दाखल झाले होते. या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नसल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांची तात्पुरती मुक्कामाची सोय दादर येथील टिळक भवन आणि पालिकेपुढील काँग्रेस कार्यालयात केली होती, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यातून सोमवारी मध्यरात्री या दोन्ही कार्यालयांतून या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT