जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे निधन झालं असून त्यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते, अशी भावूक श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना अर्पण केली.
मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते
भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. 'नटसम्राट', 'क्रांतिवीर', 'परिंदा' यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील."
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला.गोव्यातील डोना पावलामधील घरी असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.