सीजेपीचं दिल्लीत शनिवारी(ता.9) होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं रेल्वे आणि मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारच्या याच निर्णयावर सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप केला आहे. कोर्टानं दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे सेवा आणि शहरातील मेट्रो स्टेशन पूर्णपणे स्थगित न करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. तसेच नागरिकांचे काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
गजानन कीर्तीकर यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवरुन यू टर्न घेतला आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंनी मला फोन करून विचारपूस केली, त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली आहे. शिंदेंच्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास आहे,असंही त्यांनी म्हटलं. तसेच सध्या महाराष्ट्रात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे, यापुढे पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मोठं विधान किर्तीकर यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांच्यासह १० नेत्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवन येथे गेले होते. या भेटीनंतर संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, राष्ट्रपतींना भेटून आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांनीही देशात मतचोरी होत असल्याचं नाकारलं नाही. पण त्यांनी याबाबतचे पुरावे घेऊन येण्यास सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही पुरावे देणार आहोत.
ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवूनही प्रशासक पदभार स्वीकारण्यास नकार देत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही. 'चार्ज घेणार नसाल, तर थेट निलंबनाची कारवाई करू,' अशा कडक शब्दांत छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.
सध्याचे राज्यातील वातावरण पाहता निवडणुका झाल्यास राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता येईल. शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयाने सत्याच्या बाजूने निकाल दिल्यास त्यादिवशी जुन्नरमध्ये दिवाळी साजरी करू असा आशावाद शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. जुन्नर तालुक्यातील दौऱ्यानिमित्ताने जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात शुक्रवार ता. 9 रोजी खासदार राऊत बोलत होते. खासदार राऊत यांनी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यात शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिस मुख्यालयात पोलिस आयुक्त, निमलष्करी दलाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व आहे. दिल्लीतील अनेक भागात सध्या कलम १६३ लागू करण्यात आलेले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. भाजप नेते गिरीश व्यास यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील रेल्वे, मेट्रो बंद करण्याच्या निर्णयाची कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दास यांनी एक व्हिडिओ बनवत खिल्ली उडवली आहे. आमचे ५६ इंच छातीचे पंतप्रधान, विश्वगुरु रेल्वे बंद करत आहेत. मोदीजी ब्लड प्रेशर वेळच्या वेळी तपासत राहावा. दिल्लीत ५७ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने दिल्ली बंदची घोषणा केली आहे, अशा शब्दांत या तिघांनी रेल्वे आणि मेट्रोबाबत भाष्य केले.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांची तातडीने आज बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी सहा वाजता शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. महिला पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीला उपस्थित राहावे, असे सूचविण्यात आले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेले मंगेश चिवटे यांनी अखेर माघार घेतली आहे. मात्र, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) सचिन सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे सामंत यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
नाशिकमध्ये सिटीलिंक बस डेपोत कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. डेपोमध्येच कर्मचाऱ्यांमध्ये वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला, हाणामारीची घटना कशी घडली आणि याप्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागलं आहे.
पुण्यात MPSC आयोगाच्या अध्यक्षांविरोधात आंदोलन करणाऱ्या 15 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 1 ऑक्टोबरला बेकायदेशीरपणे जमाव जमावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य आयोजक प्रमोद पाटील, अक्षय कांबळेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल केलाय. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बंडखोरी करणारे भैया माने यांनी माघार घेतली आहे.. गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे...
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील वाढती बंडखोरी थंड करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत... प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पुण्यात पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची कोअर कमिटी बैठक पार पडली..... ज्यामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीवर आणि बंडखोरांना मनवण्याच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली... या निवडणुकीत महायुतीकडून शिंदेसेनेचे मंगेश चिवटे आणि भाजपचे कौस्तुभ गावडे रिंगणात असताना, शिंदेसेनेचे बंडखोर सचिन सानप आपली उमेदवारी मागे घेणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे...
भारतात Starlink सेवा सुरू करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून सर्व नियमांचे पालन करूनही व्यावसायिक परवाना मिळाला नसल्याची खंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून मस्क यांनी अंबानींना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मस्क यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यावर रिप्लाय दिला आहे. Starlink च्या भारतातील परवान्याचा मुद्दा, मस्क यांची पोस्ट आणि राहुल गांधींच्या प्रतिक्रियेमुळे आता या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्या रद्द केल्याच्या मुद्द्यावरून CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी अधिकृत केली आहे,” अशी पोस्ट दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केली आहे. आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाकडून निर्बंध लादले जात असल्याचा आरोपही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात BNSS कलम 163 लागू असून आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. नियमांचं उल्लंघन करून परिसरात येणाऱ्यांना नोटिसा देण्याची किंवा कारवाई करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अभिजीत दिपके यांच्या पोस्टनंतर आणि CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील घडामोडींना महत्त्व प्राप्त झालं आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिले जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या १० ऑक्टोबरला जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील अनेक मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचाही प्रस्ताव आहे. रेल्वेकडूनही दिल्लीत जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
इंडिया आघाडीच्या नेत्यांना राष्ट्रपतींनी रात्री आठ वाजताची भेटीची वेळ दिल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.
INDIA आघाडीचे १० सदस्यीय शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदी नेत्यांचा समावेश असू शकतो. दरम्यान, राष्ट्रपती भवनाकडून भेटीसाठी वेळ निश्चित झाली आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत निवडणूकीच्या अनुषंगाने समन्वय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कायालयात गुरुवारी (ता. ८) आयोजित बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध बाबींसाठीचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
आचारसंहिता, निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिका छपाई, माध्यम कक्ष कामकाज, मतमोजणी स्थळ व व्यवस्था, स्वीप कार्यक्रम, मतदार यादी व्यवस्थापन, तक्रार निवारण कक्ष आदी बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कायालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे गुरुवारी (ता. ८) आयोजित बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आदी उपस्थित हो
राज ठाकरेंनी सोशल मीडियाव पोस्ट करत सांगितले की, ५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.
स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.
म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा
उद्या दिल्लीत सीजेपीने आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीत जाण्यापासून त्यांना रोखण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरु असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. या आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून काही विद्यार्थी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. या उपोषण करणाऱ्या सात पैकी तिघांनी मध्यरात्री उपोषण सोडले आहे. उपोषणामुळे तिघांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने तिघांनी उपोषण सोडल्याचे सांगण्यात आलं आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मिडीयाच्या खर्चाचा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आला आहे. महापौरांच्या प्रसिद्धीवर पालिका 25 लाख रुपये खर्च करणार आहेत.
दिल्लीतील INDIA आघाडीच्या आंदोलनात अनुपस्थित असलेल्या खासदारांना पक्षाने फोन करत सुनावले खडेबोल सुनावल्याची माहिती समोर आली आहे.
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथ भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दांपत्यासह चौघांचा जागीच मृत्यू, शेतकरी महिलेसह तरुणाचाही मृतांमध्ये समावेश आहे. हेरवाडवरून कुरुंदवाडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने तीन दुचाकींना धडक दिल्याने हा अपघात घडला.
ठाण्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर हत्येप्रकरणी आज ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने महाराष्ट्रातील दुष्काळासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोंटीची मदत दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.