राज्यात एकमेकांचे नगरसेवक आपल्या पक्षात घेण्यावरुन महायुतीमध्ये नुकतीच धुसफूस पाहायला मिळाली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन भाजपचे हायकमांड अमित शहांची भेट घेतली होती. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची तक्रारही त्यांनी शहांकडे केल्याचं सांगण्यात येत होते. यानंतर आज याच एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामध्ये महत्वाची बैठक सुरु आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील जागा वाटपांबाबत यात चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अधिकारी मागील चार दिवसापासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रणपिसे यांनी नागपूर येथे भेट घेतली. मात्र ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे संघटनेने आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी(ता. 11)राज्य सरकारला फटकारलं आहे.माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुरक्षा कमी करण्याचा निर्णयावर न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
इंडिगो एअरलाईन्स या विमान कंपनीच्या ढिसाळ नियोजनाचा फटका हजारो प्रवाशांना बसला. अचानक फ्लाईटस् रद्द झाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आता इंडिगो या कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 3 ते 5 डिसेंबरपर्यंत विमान प्रवासात अडचण आलेल्या सर्व प्रवाशांना 10 हजार रुपयांचं व्हाऊचर जाहीर केलं ते ट्रॅव्हल संदर्भात आहे.
Mumbai Municipal Corporation MNS News : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील कचरा घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासमोरच आक्रमक भूमिका घेतली. मनसेसह काही कर्मचाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या कचरा संकलनामध्ये 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचा मुद्दा गुरुवारी चांगलाच चर्चेत आला होता. कारण, मुख्यमंत्री फंडातून ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी केवळ 75 हजार रुपये वाटप केल्यावरुन सभागृहात चागंलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना, महाराष्ट्राला एक नियम आणि कोकणाला एक नियम का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे आमादार निलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.
घटनाबाह्य शब्द हा उद्धव ठाकरे यांच्या आवडीचा शब्द झाला आहे. सर्वसामान्य नेता हा उपमुख्यमंत्री होतो हे त्यांना पचलेले नाही. त्यामुळे मुंबईला लुटणाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबाबत बोलू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे ऑक्टोबर महिन्यात नुकसान झाले होते. यानंतर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, जी नुकसान भरपाई मंजूर झाली असून त्याचे श्रेय आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत. मात्र, या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आज सायंकाळी सात वाजता पक्षाच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. आज ते नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर ते सर्व आमदारांना भेटणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावरून आज ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले. अमित शहांनी, भाजपने मला हिंदुत्व शिकवू नये. आरएसएसच्या कार्यालयासाठी मंदिर पाडले जाते. त्यांचे पुत्र पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतात, अशी टीका ठाकरेंनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेतून सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत काहीही नियम असू वा नसू, हे पद द्यायला सरकार कुणाला घाबरतंय, असा सवाल त्यांनी केला. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसताना दोन आहेत. मग विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय का घेतला जात नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या काळात ते पक्ष कार्यालयासह विरोधी पक्षनेत्यासाठी असलेल्या कार्यालयातही बसणार असल्याचे समजते. या कार्यालयावरील पाटीही काढण्यात आली आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गुरूवारी लोकसभेत चिटफंड व क्रेडिट सोसायट्यांशी संबंधित मुद्दा मांडला. लोकांनी आयुष्यभराची कमाई या कंपन्या व सोसायट्यांमध्ये ठेवीच्या स्वरुपात गुंतवली आहे. पण आता त्यांना हे पैसे मिळत नाहीत. केंद्र सरकारने हे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच अशी फसवणूक होणार नाही, यासाठी कायदा करावा, अशी मागणी राजेनिंबाळकरांनी केली.
शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री सहायात निधीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. माहिती अधिकारातील माहितीच्या आधारे राज्याचे कंजूष प्रमुख अशी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने अंबादास दानवे यांनी दिलेली माहिती चुकीची आणि अर्धवट असल्याचा खुलासा केला आहे. तसेच चुकीची माहिती पसरवल्याबद्दल चौकशी करून कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यावर अंबादास दानवे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
शितल तेजवानीला आज पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिची 8 दिवसांची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे दुपारी ३ नंतर तिला न्यायालयात आणले जाईल. पुणे पोलिस तिची कोठडी वाढवण्याची विनंती न्यायालयाकडे करणार आहेत. या प्रकरणातील तपासासाठी आणखी सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती पोलिसांकडून केली जाणार आहे.
ऊसाला पहिला हप्ता 3500 रूपये मिळावा या मागणीसाठी आज पंढरपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाखरी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तासभर झालेल्या आंदोलनामुळे पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
राज्यातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला. शेतकऱ्यांची लूट सुरु असून कापूस खरेदी पूर्वीप्रमाणे करणार का? सोयाबीन आणि कापसाची खरेदी हमीभावानं करा, कोणत्या केंद्रावर सोयाबिनला 5 हजारांचा हमीभाव दिला? आदी प्रश्न उपस्थित करीत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे रेल्वे न्यायालयात हजर होते. न्यायाधीशांनी त्यांना विचारला तुम्हाला गुन्हा मान्य आहे का? त्यावर 'मला गुन्हा मान्य नाही, असे राज ठाकरे न्यायाधीशांना म्हणाले. आजची सुनावली संपली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आलेल्या धाराशिव मधील तीन प्रभागातील तीन जागा व उमरगा येथील तीन प्रभागातील तीन जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, यासाठीचे चिन्ह वाटप आज होणार आहे.
विधीमंडळाचे कामकाज सुरु झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवर चर्चा होत आहे. या चर्चेला बहुसंख्य आमदार उपस्थित नसल्याने ठाकरेे सेनेेचे आमदार भास्कर जाधव संतापले.
पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची काल तोडफोड केली होती. तोडफोड करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभेच्या आजच्या कामकाजाला सुरूवात झाली असून अतिवृष्टीग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या मतदीवर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या 2024-25 च्या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि कारागृह शिपाई पदाच्या दोन हजार जागांसाठी 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात एकाच दिवशी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
सक्तवसुली संचालनालय (ED) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे मध्यरात्री ठाणे पडघा येथील बोरिवली गावात मोठी कारवाई केली आहे. 'दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडी अन् एटीएसच्या पथकाने छापेमारी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गावात तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी नागपूरच्या आमदार निवास परिसरात आंदोलन केलं होतं. त्यामुळे सिताबर्डी पोलिसांनी कडू यांच्यासह दहा आरोपीविरुद्ध विविध कलमा अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर सत्र न्यायालयात कडू यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्या खटल्यावरील सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे कडू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.